मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur : पंढरीनाथाची श्रीमंती.. कार्तिकी यात्रेमध्ये विठ्ठलाच्या चरणी कोट्यवधींचे भरभरून दान

Pandharpur : पंढरीनाथाची श्रीमंती.. कार्तिकी यात्रेमध्ये विठ्ठलाच्या चरणी कोट्यवधींचे भरभरून दान

Nov 12, 2022, 06:17 PM IST

    • pandharpur Kartiki Ekadashi : नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरच्या विठुराया चरणी भाविकांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आले आहे. यंदा विठ्ठलाच्या दानपेटीत भक्तांकडून ३ कोटी २० लाखांचे दान अर्पण करण्यात आले आहे. 
कार्तिकी यात्रेमध्ये विठ्ठलाच्या चरणी कोट्यवधींचे दान

pandharpur Kartiki Ekadashi : नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरच्या विठुराया चरणी भाविकांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आले आहे. यंदा विठ्ठलाच्या दानपेटीत भक्तांकडून ३ कोटी २० लाखांचे दान अर्पण करण्यात आले आहे.

    • pandharpur Kartiki Ekadashi : नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेत पंढरपूरच्या विठुराया चरणी भाविकांकडून भरभरून दान अर्पण करण्यात आले आहे. यंदा विठ्ठलाच्या दानपेटीत भक्तांकडून ३ कोटी २० लाखांचे दान अर्पण करण्यात आले आहे. 

Pandharpur kartiki Ekadashi : कोरोना लॉकडॉऊन काळात राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती. यामध्ये पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही बंद होते. हे मंदिर सुरू करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचितने मोठे आंदोलन केले होते. या काळात मंदिराच्या उत्पन्नात घड झाली होती. मात्र कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात पार पडलेल्या आषाढी व कार्तिकी यात्रेत विठूराया चरणी भरभरून दान प्राप्त झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रेमध्ये विठुरायाच्या चरणी भाविकांकडून तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचे दान अर्पण करण्यात आले आहे. गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठलाच्या दानपेटीत रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांचीही मोठी भर पडली आहे.

कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ कोटी २० लाख ५९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये भक्तनिवास, लाडू प्रसाद, देणगी पावती, दागिने, देवाच्या पायाजवळ भाविकांनी अर्पण केले दान असे मिळून मंदिर समितीला ३ कोटीहून अधिक रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मंदिर समितीला यंदा १ कोटी २० लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या