मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur ashadhi wari 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! यंदा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी ५ हजार विशेष बसेस धावणार

Pandharpur ashadhi wari 2023 : वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! यंदा आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी ५ हजार विशेष बसेस धावणार

May 15, 2023, 09:16 PM IST

  • Pandharpur ashadhi wari 2023 :पंढरपूर यात्रेकरिता राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्यभरातून तब्बल ५,००० विशेष गाड्या चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे. 

Pandharpur ashadhi wari 2023

Pandharpur ashadhi wari 2023 :पंढरपूर यात्रेकरिता राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC)राज्यभरातून तब्बल ५,००० विशेष गाड्या चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे.

  • Pandharpur ashadhi wari 2023 :पंढरपूर यात्रेकरिता राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्यभरातून तब्बल ५,००० विशेष गाड्या चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे. 

Pandharpur ashadhi wari 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठीजाणाऱ्या राज्यभरातील वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्यभरातून तब्बल ५,००० विशेष गाड्या चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे. २५ जून २०२३ ते ५ जुलै २०२३ दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २७ जून रोजी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

पंढरपूर यात्रेकरिता राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने बस सेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना व वारकऱ्यांनादिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगतिले.

 

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा पंढरपूर वारीसाठी ५ हजार गाड्या सोडल्या जाणार आहेत. औरंगाबाद विभागातून १२००, मुंबई विभागातून ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या