मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास खिंडार; औरंगाबादेतील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यास खिंडार; औरंगाबादेतील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा

Aug 05, 2022, 04:43 PM IST

    • औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याचा औरंगाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकीत काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादेतील ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याचा औरंगाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकीत काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.

    • औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याचा औरंगाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकीत काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद - राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज लागले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून अनेक पक्षांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका जरी पक्षाच्या नावाने होत नसल्या किंवा यात पक्षीय चिन्हाचा वापर नसला तरी नेत्यांचा सहभाग असतोच. त्यामुळे याचे मुल्यमापन पक्षाच्या पातळीवर केल्यास औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याचा औरंगाबादमधील ग्रामपंचायत निवडणुकीत काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

१२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा -

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला नामोहरण करत शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने झेंडा फडकावला आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला १५ पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला  एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालय. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे.  त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. ४० हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपसोबत जात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत संपूर्ण राज्य पिंजून काढले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत जनतेशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे राज्यभर शिनसेनेच्या बाजूने वातावरण निर्माण झाल्याचे चित्र होते. परंतु, याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीत झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

 

पुढील बातम्या