मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra rain Update : राज्यातील 'या' पाच जिल्ह्यांत पुढील चार तासांत पाऊस, पुण्यात सुरुवात

Maharashtra rain Update : राज्यातील 'या' पाच जिल्ह्यांत पुढील चार तासांत पाऊस, पुण्यात सुरुवात

Jun 01, 2023, 05:31 PM IST

  • Maharashtra Weather Update : ठाणे, पुण्यासह राज्याच्या काही जिल्ह्यात येत्या ४ तासांत तुरळक पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Weather Updates

Maharashtra Weather Update : ठाणे, पुण्यासह राज्याच्या काही जिल्ह्यात येत्या ४ तासांत तुरळक पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

  • Maharashtra Weather Update : ठाणे, पुण्यासह राज्याच्या काही जिल्ह्यात येत्या ४ तासांत तुरळक पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Maharashtra Rain Prediction : गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्राला वातावरण बदलाची चाहूल लागली आहे. उष्णतेच्या लाटेमुळं मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना लवकरच सुखद गारवा अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुन्हा एकदा हवामान विभागानं वादळवाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह पावसाच्या तुरळक सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान ताशी ३०-४० किमी वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळं घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुण्यात पावसाला सुरुवातही झाली आहे. बाणेर भागात पावसांच्या सरींसह गारांचा मारा सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही वादळवाऱ्यासह पाऊस सुरू आहे. मात्र, हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचीही चिन्हं आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या