मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  weather update : राज्यात लवकरच धडकणार मॉन्सून; पूर्व मौसमी पावसामुळे उष्णतामानात होणार मोठी घट

weather update : राज्यात लवकरच धडकणार मॉन्सून; पूर्व मौसमी पावसामुळे उष्णतामानात होणार मोठी घट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 01, 2023 07:40 AM IST

State weather update : राज्यात लवकरच मॉन्सून सक्रिय होणार आहे. ११ जूनच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मुंबई, पुण्यासह राज्यातील नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळणार आहे.

Pedestrians use umbrellas to shield themselves as they walk on a road amid heavy monsoon rainfall, in Kolkata. Meanwhile, the scarcity of rain in Bengal's jute-producing districts has slowed down the supply of golden fibre to mills amid bumper crop estimates, an official said on Sunday
Pedestrians use umbrellas to shield themselves as they walk on a road amid heavy monsoon rainfall, in Kolkata. Meanwhile, the scarcity of rain in Bengal's jute-producing districts has slowed down the supply of golden fibre to mills amid bumper crop estimates, an official said on Sunday (PTI)

मुंबई: राज्यात लवकरच मॉन्सून सक्रिय होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणेकरांसह राज्यातील नागरिकांना उष्मा आणि आर्द्रतेपासून दिलासा मिळू शकतो. नैऋत्य मॉन्सूनची लवकरच सक्रिय होणार असल्याने राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather Alert : उकड्यामुळे मुंबईकर झाले त्रस्त; मॉन्सून राज्यात येण्याची प्रतीक्षा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) या वर्षीच्या मान्सूनच्या आगमनाच्या तारखेबद्दल अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. मॉन्सूनसध्या केरळमध्ये दाखल होणाच्या तयारीत आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. या वर्षी, IMD ने म्हटले आहे की, मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ५. ते ६ जूनच्या सुमारास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणी चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. असे झाल्यास, यामुळे पाऊस लांबू शकतो. जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन १५ जूनपर्यंत चार दिवसांनी लांबले होते.

LPG Price 1 June : मोठी बातमी! LPG सिलेंडर पुन्हा झाला स्वस्त; तब्बल इतक्या रुपयांची झाली घट, पाहा नवे दर

वॅगरीज ऑफ वेदर या खाजगी हवामानाचा अंदाज देणारा ब्लॉग चालवणारे राजेश कपाडिया म्हणाले, "मुंबईत ७ ते ८ जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तथापि, योग्य मान्सूनचा हंगाम १४ ते १५ जूनच्या आसपास तयार होऊ शकतो. ३ जूनच्या आसपास मान्सूनचा नवा भोवरा तयार होणे अपेक्षित आहे. एकदा तो तयार झाल्यानंतर मॉन्सून बळकट होईल. कपाडिया म्हणाले की जून आणि जुलै महिन्यात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमानाची कमतरता दिसून येईल. अरबी समुद्रात ५-६ जूनच्या सुमारास कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

स्कायमेट वेदरचे हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात मान्सूनपूर्व सरी अपेक्षित आहेत. मुंबईत मॉन्सूनची सुरुवात समाधानकारक असू शकते. तथापि, मराठवाडा आणि विदर्भासारख्या राज्याच्या अंतर्गत भागात पुरेसा पाऊस पडणार नाही, अशी शक्यता आहे.

WhatsApp channel