मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar Train Updates: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल रद्द; अनेक गाड्यांना तब्बल पाऊस तास उशीर

Palghar Train Updates: ओव्हरहेड वायर तुटल्याने वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल रद्द; अनेक गाड्यांना तब्बल पाऊस तास उशीर

Nov 01, 2023, 10:38 AM IST

  • Mumbai Local Train News Updates : मुंबईत लोकलसेवेच्या बोजवारा उडाला आहे. डहाणूला डाउन लाईनच्या ओव्हरहेड वायर अचानक तुटली. यामुळे वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल फेऱ्या रद्द करण्यात आला आहे.

Palghar Local Train News (HT)

Mumbai Local Train News Updates : मुंबईत लोकलसेवेच्या बोजवारा उडाला आहे. डहाणूला डाउन लाईनच्या ओव्हरहेड वायर अचानक तुटली. यामुळे वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल फेऱ्या रद्द करण्यात आला आहे.

  • Mumbai Local Train News Updates : मुंबईत लोकलसेवेच्या बोजवारा उडाला आहे. डहाणूला डाउन लाईनच्या ओव्हरहेड वायर अचानक तुटली. यामुळे वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल फेऱ्या रद्द करण्यात आला आहे.

Palghar Local Train News : आधीच अनेक लोकलगाड्या रद्द असल्याने मुंबईकर त्रस्त असतांना पश्चिम रेल्वेच्या डहाणू-वानगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर आज सकाळी अचानक तुटली. यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या मार्गावरील गाड्या या पाऊण तास उशाराने धावत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Parbhani Bandh: मराठा आरक्षणासाठी आज परभणी बंदची हाक; बाजारपेठा राहणार बंद

आज सकाळी अचानक डहाणूला डाउन लाईनची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे वाणगाव ते डहाणू दरम्यानच्या लोकल रद्द करून त्या केळवेरोड, पालघर, बोईसर किंवा वाणगाव येथून सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. बोईसर- दिवा ही गाडी रद्द करण्यात आली आहे. या ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरच्या बहुतांश गाड्या या पाऊण तास उशिराने धावत आहेत. उमरोळी स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नव्हती. आज झालेल्या तांत्रिक बिघडामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र, चांगलेच हाल झाले.

सध्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या प्रकारामुळे २२९५३ MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून ७.४० वाजता सुटणार आहे. तर १२००९ ही गाडी MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून ७.२० वाजता सुटणार आहे. २२१९६ BDTS-VGLJ ही गाडी दादर येथून ६.३० वाजता सुटणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या २०४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामांसाठी २९ दिवसांच्या सुरू असेल्या मेगाब्लॉकमुळे ३१६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या