मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Congress: काँग्रेसच्या चिंतन शिबिराला अनुपस्थिती, पक्षातील १० आमदारांना कारणे दाखवा नोटीस

Congress: काँग्रेसच्या चिंतन शिबिराला अनुपस्थिती, पक्षातील १० आमदारांना कारणे दाखवा नोटीस

Feb 18, 2024, 07:03 AM IST

  • Congress conclave In Lonavala: पक्षांतराच्या चर्चेमुळे लोणावळा येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला १० आमदार अनुपस्थित राहिले. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Nana Patole

Congress conclave In Lonavala: पक्षांतराच्या चर्चेमुळे लोणावळा येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला १० आमदार अनुपस्थित राहिले. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

  • Congress conclave In Lonavala: पक्षांतराच्या चर्चेमुळे लोणावळा येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला १० आमदार अनुपस्थित राहिले. त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Maharashtra Congress: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोठचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने लोणावळा येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराला काही आमदार उपस्थित नव्हते, अशा आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

अनुपस्थित आमदारांमध्ये माधव पवार-जावळगावकर, मोहन हंबर्डे, गीतेश अंतापूरकर (हे तिघेही नांदेड जिल्ह्यातील आमदार आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत), सुलभा खोडके, जीशान सिद्दीकी, अमीन पटेल, अमित झनक यांचा समावेश होता. पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्य नेतृत्वाला हा विषय गांभीर्याने घेऊन विनाकारण अधिवेशनाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते.

चव्हाण यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर आणि नजीकच्या काळात काँग्रेसचे डझनभर आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदारांची अनुपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. १५ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सातहून अधिक आमदार गैरहजर होते.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित केले. चेन्नीथला यांनी शनिवारी अधिवेशनात भाग घेतला. तर, समारोप नाना पटोले यांनी केला. संमेलनानंतर माध्यमांशी बोलताना पटोले यांनी केवळ सात आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावल्याचा दावा केला. यानंतर गैरहजर असलेल्या पदाधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या परिषदेत काँग्रेसने तीन ठराव मंजूर केले. पहिले म्हणजे निवडून आल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन देण्यात आले. दुसऱ्या ठरावात महिलांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी आणि सरकारी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा निषेध केला. आपल्या स्वार्थासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत तिसऱ्या ठरावात मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला आहे.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधी- नेहरू विचारसरणी संपवण्याच्या तयारीत असल्याने आमच्यासाठी ही 'करो या मरो'ची निवडणूक आहे, असे चेन्नीथला म्हणाले. निवडणुका शास्त्रोक्त पद्धतीने लढल्या पाहिजेत आणि बुथचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

"मोदींना तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यापासून केवळ महाराष्ट्रच रोखू शकतो आणि त्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. जनतेची भावना काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. भाजपचा खोटारडेपणा आणि फसवेगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या