मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushma Andhare: ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याकडून सुषमा अंधारेंवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न

Sushma Andhare: ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याकडून सुषमा अंधारेंवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 17, 2024 07:29 PM IST

Ahmednagar District Court: अहमदनगर जिल्हा न्यायालयात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याकडून सुषमा अंधारेंवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे.

Sushma Andhare
Sushma Andhare

Smita Ashtekar On Sushma Andhare: अहमदनगर जिल्हा न्यायालयात ठाकरे गटाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी सुषमा अंधारे यांना चेप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच मनेसेच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील त्यांना धुक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी स्मिता अष्टेकर यांना रोखून ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथे जानेवारी महिन्यात वकील दामत्याची अपहरण करून हत्या करण्यात आली. राजाराम जयवंत आढाव (वय, ५२) आणि त्यांची पत्नी मनिषा राजाराम आढाव (वय, ४२) असे हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या खळबळजनक घटनेनंतर वकील सुरक्षा कायदा लागू करण्याची मागणी केली होती. यानुसार, सुषमा अंधारे यांनी आज अहमदनगर बार असोसिएशनच्या वकिलांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान सुषमा अंधारे यांना धक्काबुक्की आणि चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न झाला.

सुषभा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांविरोधात आक्षपार्ह वक्तव्य केल्याचा स्मिता अष्टेकर यांनी आरोप केला आहे. तसेच गेल्या ३० वर्षांपासून मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करत होते. बाळासाहेबांनीदेखील अशा महिलेला स्वीकारले नसते म्हणूनच मी सुषमा अंधारे यांना विरोध केला, असे स्मिता अष्टेकर यांनी स्पष्टीकरण दिले.

या घटनेनंतर सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,"हा विरोधात कशासाठी होता, याची मला माहिती नाही. मात्र, स्टंटबाजी करणाऱ्या महिलांना कॅमेरा लागतो. कदाचित कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी हा स्टंट करण्यात आला असावा."

IPL_Entry_Point

विभाग