मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Onion Rate : होळी दिवशीच शेतकऱ्याचे धक्कादायक पाऊल, योग्य दर मिळत नसल्याने दीड एकरातील कांदा जाळला

Onion Rate : होळी दिवशीच शेतकऱ्याचे धक्कादायक पाऊल, योग्य दर मिळत नसल्याने दीड एकरातील कांदा जाळला

Mar 06, 2023, 04:42 PM IST

  • Onion rate issue : येवला  तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

दर नसल्याने दीड एकरातील कांदा जाळला

Onionrate issue : येवलातालुक्यातीलशेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

  • Onion rate issue : येवला  तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

Onionrate issue in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांदा दराच्या प्रश्नाने राजकारण तापले आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा विकल्यानंतर केवळ २ रुपयांचा चेक मिळाल्याचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यात आला होता. त्याचबरोबर नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याची घोषणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्यानंतरही कांदा दरातील घसरण कायम असून शेतकऱ्यांना कांदा उत्पादनाचा खर्च तर दूर मात्र वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी कांदा फुटक वाटत आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक एका शेतकऱ्यावर होळीदिवशीच कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याला हमीभाव नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

कृष्णा डोंगरे असे कांदा पिकाची होळी केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली कांद्याचा प्रश्न सुटलेला नाही.यामुळे कांदा दरांतील घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे. कृष्णा डोंगरे यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला आग लावून होळी साजरी करत सरकारीचा निषेध व्यक्त केला.

राज्यातील कांद्याच्या दराने निचांक गाठला आहे. त्यामुळे कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कांद्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याची होळी करून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याने पंधरा दिवसांपूर्वी कांद्याची होळी करणार असल्याची पत्रिका काढून सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

या कांदा अग्निडाग समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. पत्रिकेत दिलेल्या वेळेप्रमाणे या शेतकऱ्याने आज होळीच्या दिवशी सकाळी अकरा वाजता तब्बल दीड एकरावरील कांद्याला आग लावली.

सरकारकडून हमीभाव मिळत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा जाळून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे यंदाची होळी शेतकऱ्यांसाठी काळी होळी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी सरकारला काही देणं-घेणं नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या