मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Avani Nakate : नऊ वर्षांच्या अवनीवर केलेली बायपास सर्जरी यशस्वी; वैद्यकीय क्षेत्रातली दुर्मिळ घटना

Avani Nakate : नऊ वर्षांच्या अवनीवर केलेली बायपास सर्जरी यशस्वी; वैद्यकीय क्षेत्रातली दुर्मिळ घटना

Aug 16, 2022, 10:51 AM IST

    • Solapur Avani Nakate Heart News : माझ्या अनुभवावरून सांगतोय की मी आतापर्यंत बायपास सर्जरी केलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी म्हटलं आहे.
Solapur Avani Nakate Heart News (HT)

Solapur Avani Nakate Heart News : माझ्या अनुभवावरून सांगतोय की मी आतापर्यंत बायपास सर्जरी केलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी म्हटलं आहे.

    • Solapur Avani Nakate Heart News : माझ्या अनुभवावरून सांगतोय की मी आतापर्यंत बायपास सर्जरी केलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी म्हटलं आहे.

Solapur Avani Nakate Heart News : कोणताही गंभीर आजार किंवा विशेषत: हार्ट अटॅक हा जास्त वय असलेल्या लोकांनाच होतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. परंतु हे सत्य नाही. कारण गेल्या काही वर्षात वयोवृद्ध लोकांसह तरुण आणि किशोरवयातील मुलांनाही हार्ट अटॅक येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता सोलापूरातील नऊ वर्षांच्या अवनी नकाते या चिमुकलीला हार्ट अटॅक आला होता, परंतु तिच्या बायपास सर्जरी केल्यानं तिचा जीव वाचला आहे. साधारणत: ज्या इतक्या कमी वयाच्या रुग्णावर बायपास सर्जरी केली जात नाही, परंतु मुंबईतील डॉक्टरांच्या हिम्मतीनं ते शक्य झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: पुणे, कोल्हापूर, सातारा, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता! मुंबईत उकाडा कायम

नेमकं प्रकरण काय?

सोलापूर जिल्ह्यातील अवनी नकाते या नऊ वर्षीय मुलीला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. तिचं ह्रदय वयोवृद्ध आजोबासारखं कमकुवत झाल्यानं तिच्या पालकांनी तिला तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी तिच्यावर अनेक चाचण्या केल्यानंतर तिच्यावर बायपास सर्जरी केल्याशिवाय पर्याय नसल्यांच तिच्या पालकांना सांगितलं. सहसा इतक्या कमी वयाच्या रुग्णावर अशा प्रकारची सर्जरी करणं धोकादायक असतं, परंतु अवनीच्या पालकांनी सर्जरी करण्याची संमती दिल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर बायपास सर्जरी केली आहे. त्यामुळं अवनीचा जीव वाचला असून वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्वात दुर्मिळ घटनांपैकी एक असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरी खेळत असताना आलेल्या हार्ट अटॅकमुळं पालकांनी अवनीला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल केलं होतं. डॉक्टरांनी तपासणी केली असता अवनीची कोलेस्ट्रॉल लेव्हल हाय होती. तिचं ह्रदयही कमकुवत झालं होतं, इतक्या कमी वयाच्या रुग्णाला अशा पद्धतीचा आजार झाल्याचं पाहून डॉक्टरही चक्रावून गेले होते.

वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ केस...

सोलापूरच्या अवनीला हायपकोलेस्ट्रोलमिआ हा आजार झाला होता, त्यामुळं तिच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातली वाढल्यानं तिला ह्रदयविकाराचा झटका आला, प्रत्येक व्यक्तीची कॉलेस्ट्ऱॉल लेवल ही १५० ते २०० mg/dl इतकं असायला हवं, ते अवनीच्या बाबती ६०० पेक्षाही जास्त होतं, त्यामुळं इतक्या मोठा धोक्यातून बाहेर आलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

अवनीवर बायपास सर्जरी करण्यात आल्यानंतर अनेक रुग्णालयातील डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझ्या अनुभवावरून सांगतोय की मी आतापर्यंत बायपास सर्जरी केलेला हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचं डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी म्हटलं आहे.

सर्जरी झाल्यानंतर आता अवनीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तिला काही वर्ष गोळ्या आणि औषधांचा आधार घ्यावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याचबरोबर तिला नेहमीच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवावं लागणार असून सातत्यानं वैद्यकीय तज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या