मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Gote Resignation : उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा झटका, पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा राजीनामा

Anil Gote Resignation : उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा झटका, पक्षाचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा राजीनामा

Aug 09, 2023, 03:33 PM IST

    • Anil Gote Resignation : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
NCP Leader Anil Gote Resignation (HT)

Anil Gote Resignation : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

    • Anil Gote Resignation : राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.

NCP Leader Anil Gote Resignation : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष राजकीय संकटात सापडला आहे. त्यातच आता माजी आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीतील गटबाजीच्या राजकारणाला कंटाळलो असून अशा राजकारणासाठी आपण पात्र नाही, असं म्हणत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते कुठल्या पक्षात जाणार, याबाबत अनिल गोटे यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला गळती लागलेली असतानाच आता राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

राष्ट्रवादीच्या उपाध्यपदाचा राजीनामा देताना अनिल गोटे म्हणाले की, भाजपच्या राजकारणाला कंटाळून मी आमदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम केलं. परंतु राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी आणि गटबाजीच्या राजकारणाला मी अपात्र आहे. त्यामुळंच राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढे लोकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी लढत राहणार असल्याचंही अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत अनिल गोटे?

अनिल गोटे हे धुळे शहर विधानसभा मतदारसंधातून अनेक वर्ष आमदार राहिलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सलग तीन वेळा धुळे विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा विधानसभेत पहिल्यांदाच पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षालाही अनिल गोटे यांनी रामराम ठोकल्याने आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या