मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : मणिपूरमध्ये माझ्या भारतमातेची हत्या करण्यात आलीय; राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

Rahul Gandhi : मणिपूरमध्ये माझ्या भारतमातेची हत्या करण्यात आलीय; राहुल गांधी लोकसभेत आक्रमक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 09, 2023 01:07 PM IST

Rahul Gandhi Speech In Lok Sabha : खासदारकी मिळाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा लोकसभेत दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार आगपाखड केली आहे.

rahul gandhi speech in parliament today
rahul gandhi speech in parliament today (PTI)

rahul gandhi speech in parliament today : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर मंगळवारपासून चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अविश्वास ठरावावर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मणिपुरातील हिंसाचार आणि बलात्कार प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारवर आगपाखड केली आहे. त्यानंतर आज दुपारी काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जोरदार भाषण करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मणिपुरात सुरू असलेल्या हिंसाचार आणि बलात्काराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का आहेत?, मी मणिपुरात गेलो होतो, तेथील महिलांनी स्थिती मला सांगितली, त्यामुळं मी आतून हादरून गेलो. परंतु मोदी सरकारमधील नेत्यांना मणिपुरचा दौरा करायला वेळ नाही. मोदी सरकारने मणिपुरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसेला थांबवणार नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या भारतमातेची हत्या करत राहणार असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपुरमधील लोकांचा आवाज ऐकू येत नाही. त्यांना देशातील केवळ दोनच लोकांचा आवाज ऐकू येतो. भारतीय सैन्याने ठरवलं तर एका दिवसात मणिपुरात शांती प्रस्थापित होईल, परंतु मोदी तेथे शांती आणण्याचे प्रयत्नच करत नाहीय. परंतु मोदी यांनी लक्षात ठेवावं की प्रभू रामाने रावणाला नव्हतं मारलं, अहंकारामुळं रावण संपला होता, तुम्ही संपूर्ण देशात रॉकेल टाकून आग लावण्याचं काम करत आहात, हेच तुम्ही हरणायासह अन्य राज्यांमध्ये करत आहात. देशातील हिंसाचार थांबवा, नाही तर जनता तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

WhatsApp channel