मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule : बाळासाहेबांचं सगळं चालतं, तर मग मुलगा अन् नातू का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule : बाळासाहेबांचं सगळं चालतं, तर मग मुलगा अन् नातू का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल

Sep 27, 2022, 05:07 PM IST

    • बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे (supriya sule) यांनी शिंदे गटाला केला आहे.
सुप्रिया सुळेंचा सवाल

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालतं,बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही?असा सवाल सुळे (supriya sule) यांनी शिंदे गटाला केला आहे.

    • बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे (supriya sule) यांनी शिंदे गटाला केला आहे.

अहमदनगर - एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाच्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाने खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा करत पक्षाच्या चिन्हावर हक्का सांगितला आहे. याची सुनावणी सर्वोच्चा न्यायालयात होत असून याचे थेट प्रक्षेपणही केले जात आहे. या वादात आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मुळात हा संघर्षच दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे (supriya sule) यांनी शिंदे गटाला केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनासाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाट्नाला सुप्रिया सुळे अहमदनगरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या.

सुप्रिया सुळे म्हल्या की, पक्षांतर्गत काही मतदेत असतील, काही वैयक्तिक कारण असेल तर तुम्ही खुशाल वेगळं घर करा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मात्र अशा प्रकारे ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबावर आरोप करणं चुकीचं आहे. शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली, त्यावेळेस त्यांनी वेगळा पक्ष काढला तेव्हा त्यांनी खरी काँग्रेस माझीच आहे, असा वाद निर्माण केला नाही. परंतु सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण पाहून बाळासाहेबांना नक्कीच वेदना होत असतील, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपवर टीका करताना सुळे म्हणाल्या की. भाजपला एक पक्ष एक देश असा अजेंडा राबवायचा आहे. तर आमचा विचार तसा नसून एक देश अनेक पक्ष असा आहे. कुठलाही पक्ष छोटा किंवा मोठा नसतो. त्याच्या मागे एक वैचारिक बैठक असते. भाजप हा मोठा पक्ष आहे. देश पातळीवरचा पक्ष आहे. ते राजे आहेत त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी ही त्यांची संस्कृती असेल असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढील बातम्या