मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: मोदी सरकारचा महाराष्ट्राविरोधात कट, वेदांता प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा आरोप

Supriya Sule: मोदी सरकारचा महाराष्ट्राविरोधात कट, वेदांता प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा आरोप

Sep 14, 2022, 03:06 PM IST

    • Supriya Sule On Vedanta Project: वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार सुप्रिया सुळे (PTI)

Supriya Sule On Vedanta Project: वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

    • Supriya Sule On Vedanta Project: वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Supriya Sule On Vedanta Project: वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून अचानक गुजरातला नेण्यात आल्यानं आता राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडलं आहे. वेदांता प्रकल्पावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याला सिरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे. तसंच मोदी सरकार महाराष्ट्राविरोधात कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी सगळ्या मंडळांमध्ये जावून सगळं साजरं करावं. पण मी सातत्याने सांगतेय की महाराष्ट्राला सिरियस मुख्यमंत्र्याची गरज आहे. वेळ पडली तर या सरकारनं दोन मुख्यमंत्री नेमावेत. एकाने यात्रेवर जावं आणि एकाने राज्य चालवावं. महाराष्ट्राचं आता जे नुकसान झालं आहे ते यामुळे होणार नाही आणि हे नुकसान महाराष्ट्राला परवडणार नाही.

वेदांता प्रकल्पामुळे राज्यात लाखो नोकऱ्या मिळणार होत्या. पण असं काय घडलं की आपल्या हातातला घास काढून घेतला गेला असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्र आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारचा हा महाराष्ट्राविरोधातला कट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे सरकार सत्तेत आले आहे. मात्र छत्रपती कधी दिल्लीसमोर झुकले नाहीत. पण हे सरकार सातत्यानं दिल्ली म्हणेल तसंच करत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे शिवसेनेकडे भाजप येत होते, पण आता शिंदे गटाचे निर्णय दिल्लीतून व्हायचे. नवी संस्कृती महाराष्ट्रात येत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी हे हानिकारक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढील बातम्या