मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashutosh Kale: सरकार गेलं असलं तरी आमदार मीच आहे, नादी लागाल तर ठोकून काढू; NCP च्या आमदाराची धमकी

Ashutosh Kale: सरकार गेलं असलं तरी आमदार मीच आहे, नादी लागाल तर ठोकून काढू; NCP च्या आमदाराची धमकी

Aug 20, 2022, 03:58 PM IST

    • NCP vs BJP In Kopargaon : राष्ट्रवादीनं दहीहंडीनिमित्त कोपरगावातील छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या कमानीवरून वाद झाला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारानं भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.
Ashutosh Kale

NCP vs BJP In Kopargaon : राष्ट्रवादीनं दहीहंडीनिमित्त कोपरगावातील छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या कमानीवरून वाद झाला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारानं भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.

    • NCP vs BJP In Kopargaon : राष्ट्रवादीनं दहीहंडीनिमित्त कोपरगावातील छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या कमानीवरून वाद झाला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदारानं भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.

MLA Ashutosh Kale on BJP : दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात राष्ट्रवादीनं दहीहंडीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी चौकात उभारलेल्या कमानीवरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दहीहंडीचे कार्यक्रम एकमेकांच्या शेजारी पार पडले आहेत, परंतु आता याच मुद्यावरून तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

आमदार काळेंनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे की, काही लोकांना वाटतंय की राज्यात सरकार बदललं आहे, त्यामुळं त्यांचा उत्साह वाढला असला तरी तालुक्याचा आमदार अजून बदललेला नाही, कोपरगावचा आमदार मीच असून नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी इशारावजा धमकी त्यांनी भाजप कार्यकर्यांना दिला आहे.

शहरातील कमानीवरून झाला होता राडा...

राष्ट्रवादीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वागत कमान उभारली होती, त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर दहीहंडीच्या पूर्वसंध्येला भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही करावा लागला होता. पोलिसांनी राष्ट्रवादीनं उभारलेली कमान हटवल्यानंतर हा वाद शांत झाला होता, परंतु आता आमदार काळेंनी भाजपला इशारावजा धमकी दिल्यानंतर आता तालुक्यात पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

कोपरगावात कोल्हे-काळेंमध्ये राजकीय संघर्ष पुन्हा पेटणार?

कोपरगावात तालुक्यात काळे आणि कोल्हे घराण्याचा राजकीय संघर्ष फार जुना आहे, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्नेहलता कोल्हेंनी राष्ट्रवादीचा पराभव केला होता, त्यानंतर २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांनी स्नेहलता कोल्हेंचा पराभव केला, त्यामुळं तालुक्यात नेहमीच काळे विरुद्ध कोल्हे असा राजकीय संघर्ष राहिलेला आहे. परंतु आता राज्यात सत्ताबदल झाल्यानं आणि शहरातील दहीहंडीच्या कमानीवरून पुन्हा काळे आणि कोल्हे गटात राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या