मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar :"टिल्ल्या लोकांनी सांगू नये, त्यांची उंची किती अन् झेप किती"; अजित पवारांचा टोला

Ajit Pawar :"टिल्ल्या लोकांनी सांगू नये, त्यांची उंची किती अन् झेप किती"; अजित पवारांचा टोला

Jan 04, 2023, 09:35 PM IST

  • छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाजप आमदार नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.

अजित पवार

छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाजप आमदार नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.

  • छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत भाजप आमदार नितेश राणेंचा खरपूस समाचार घेतला.

Ajit Pawar on Nitesh Rane : हिवाळी अधिवेशनात छत्रपतींना धर्मवीर म्हणून नका ते स्वराज्य रक्षक होते, असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावर भाजपने टीका केल्यानंतर आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. छत्रपती संभाजी महाराज हे' स्वराज्य रक्षक' की धर्मवीर यावरून सुरू झालेल्या वादावर अजित पवारयांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे.' मी कुठलंही वादग्रस्त विधान केलेलं नाही.' स्वराज्यरक्षक' ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देणारी आहे, त्यामुळं त्यावर मी आजही ठाम आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

यावेळी अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर पलटवार करताना म्हटले की, त्यांच्यावर आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की,टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती? असे म्हणत त्यांच्या आरोपांना पक्षाचे प्रवक्ते उत्तर देतील असे पवार यांनी म्हटले. अशा लोकांच्याआपण नादाला लागत नसल्याचेअजित पवार यांनी आपल्या शैलीत म्हटले.

अजित पवार म्हणाले की, छत्रपती संभाजीराजेच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले. भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या