मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सरन्यायाधीशांच्या सत्काराला CM शिंदे उपस्थित, हे संकेतांना धरून नाही : राष्ट्रवादी

सरन्यायाधीशांच्या सत्काराला CM शिंदे उपस्थित, हे संकेतांना धरून नाही : राष्ट्रवादी

Sep 11, 2022, 10:40 AM IST

    • NCP on CM Eknath Shinde: सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल."
मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

NCP on CM Eknath Shinde: सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल."

    • NCP on CM Eknath Shinde: सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल."

NCP on CM Eknath Shinde: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबईत शनिवारी उच्च न्यायालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे सुपुत्र असणाऱ्या सरन्यायाधीश लळीत यांच्या सत्कार समारंभावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना म्हटलं की, "गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे सरन्यायाधीश लळीत हे न्याय क्षेत्रात दीपस्तंभच ठरतील. देशातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी योग्य मार्गही मिळेल." दरम्यान, सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्रीही उपस्थित असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच हे संकेतांना धरून नसल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की, "सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे, हे संकेतांना धरून नाही." शिवसेनेत बंडखोरीनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करून सुनावणी सुरू आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय उदय लळीत यांना संस्कृतमधील गौरवपत्र दिले. तसंच उदय लळीत यांच्या पत्नी अमिता यांना मानचिन्ह देण्यात आले. शनिवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यामूर्ती दीपांकर दत्ता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी उपस्थित होते.

सत्कारानंतर बोलताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईतून कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर आज मुंबईत सर्वांच्या उपस्थितीत सरन्यायाधीश म्हणून सत्कार स्वीकारताना कृतज्ञ वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालय ही माझी मातृसंस्था आणि कर्मभूमी असल्याचंही सरन्यायाधीश लळीत यांनी सांगितले.

पुढील बातम्या