मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Navy day 2023 : नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा; पदांची नावेही बदलणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Navy day 2023 : नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा; पदांची नावेही बदलणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Dec 04, 2023, 07:31 PM IST

  • PM Narendra Modi In Sindhudurg : नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात केली.

pm Narendra modi

PM Narendra Modi In Sindhudurg : नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात केली.

  • PM Narendra Modi In Sindhudurg : नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात केली.

सिंधुदुर्गात आज नौदल दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तिमान हे सर्वात पहिल्यांदा ओळखलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला असे गौरवोद्वार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप आणून हा ध्वज शिवरांयांच्या विचारांशी जोडता आला. आता शिवरायांनी कमावलेली नौदलाची ती शक्ती आपण नंतर गमावलो, आता ती पुन्हा मिळवायची आहे. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गवर साजरा होतोय हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

नौदलाच्या पदांची नावे बदलणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारताने गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. आता आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत. गेल्या वर्षी नौदलाचा ध्वजाचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं. हे माझं भाग्य समजतो. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची मुद्रा असेल. तसेच नौदलाच्या पदाला भारतीय परंपरेची नावे देणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

पुढील बातम्या