मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतिदिनी अभिवादन करताना अभिनेत्रीचा फोटो लावल्याने नारायण राणे झाले ट्रोल

डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतिदिनी अभिवादन करताना अभिनेत्रीचा फोटो लावल्याने नारायण राणे झाले ट्रोल

Feb 27, 2024, 09:53 AM IST

    • Narayan Rane news : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा सोमवारी स्मृतिदिन झाला  असून त्यांना अभिवादन करतांना अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केल्याने नारायण राणे सध्या ट्रोल होत आहेत.
Narayan Rane news

Narayan Rane news : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा सोमवारी स्मृतिदिन झाला असून त्यांना अभिवादन करतांना अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केल्याने नारायण राणे सध्या ट्रोल होत आहेत.

    • Narayan Rane news : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा सोमवारी स्मृतिदिन झाला  असून त्यांना अभिवादन करतांना अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केल्याने नारायण राणे सध्या ट्रोल होत आहेत.

Narayan Rane news : नारायण राणे हे भाजपचे कोकणातील धडाडीचे नेते आहेत. ते त्यांच्या बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या बेधडक विधानांमुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले आहेत. भारतातिल पहिल्या महिला डॉक्टर आनंदी बाई जोशी यांच्या स्मृतिदिनामित्त  राणे यांनी फेसबूकवर एक फोटो पोस्ट केला असून यामुळे  ते सध्या चांगलेच ट्रोल होत आहे. या  पोस्टवरुण नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India Flight: विमान हवेत असताना सेन्सर झाले बंद, तपासणी केली असता धक्कादायक प्रकार उघड!

Pune Porsche accident : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक

Malegaon news : मालेगावात माजी महापौरावर गोळीबार! हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; तीन गोळ्या झाडल्या

Jitendra Awhad: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती समावेशास विरोध; जितेंद्र आव्हाड महाडमध्ये करणार मनुस्मृतीची होळी

Gokhale Bridge : रखडलेला गोखले पुल अखेर सुरू! एक मार्गिका केली खुली; 'या' वाहनांना पुलावर बंदी

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा २६ फेब्रुवारी स्मृतिदिन झाला असून या निमित्त नारायण राणे यांनी एक फोटो पोस्ट करून त्यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त केली. मात्र, हा फोटो पोस्ट करतांना त्यांनी आनंदी बाजी जोशी यांच्या फोटो ऐवजी त्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिचा फोटो लावला. हा फोटो पोस्ट करणे त्यांच्या आता अंगलट आले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या पोस्टवरून त्यांना ट्रोल करणे सुरू केले आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या कृतीचा खरपूस समाचार देखील घेतला आहे. एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचा फोटो लावतांना काळजी घेणे गरजेचे असतांना अशी चूक काशी होऊ शकते असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी अर्वाच्य भाषेत देखील नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. आनंदी बाई जोशी यांना अभिवादन करायलाच हवे, पण फोटो कुणाचा लावला ही तरी बघा असे एका नेटकाऱ्याने राणे यांच्या पोस्ट वार कमेंट करत म्हटले आहे.

आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असून त्यांच्या जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात झाला. त्यांचे आधीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्याहून वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी होते. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले.

वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कलकत्त्याला बदली घेतल्यावर तेथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे आणि बोलणे शिकल्या. यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च इ.स. १८८६ मध्ये एम.डी.ची पदवी मिळवत आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या