मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले तो काय देशाचा मोठा नेता होता की विद्वान?

नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले तो काय देशाचा मोठा नेता होता की विद्वान?

Jan 08, 2024, 08:53 PM IST

  • Narayan Rane on Sharad Mohol: कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या दिवस रात्र बातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की?  कोण विद्वान होता? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

Narayan Rane on Sharad Mohol

Narayan Rane on Sharad Mohol: कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्यादिवस रात्रबातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की? कोण विद्वान होता?असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

  • Narayan Rane on Sharad Mohol: कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या दिवस रात्र बातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की?  कोण विद्वान होता? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. आज भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वनं केलं. शरद मोहोळ हे हिंदुत्ववादी होते. मीडियानं त्यांची चुकीची प्रतिमा रंगवू नये,असं आवाहन नीतेश राणे यांनी केलं. मात्र नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद मोहोळला माध्यमांकडून देण्यात येत असलेल्या प्रसिद्धीवरून नाराजी व्यक्त करत म्हटले की, तो कोण देशाचा मोठा नेता होता की, मोठा विद्वान होता? अशी सवाल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या दिवस रात्र बातम्या चालवता. तो कोण देशाचा मोठा नेता होता की?कोण विद्वान होता? असा प्रश्न उपस्थित केला.

आज पुण्यात असलेल्या नीतेश राणे यांनी शरद मोहोळ कुटूंबीयांची भेट घेतल्यानंतर म्हटले की, मोहोळ एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते. संकटाच्या काळात ते आणि त्यांचं कुटुंब हिंदूंच्या मदतीला धावून जात होते. त्यामुळं आताच्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबासोबत उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या भावनेतूनच मी इथं आलो होतो.

हिंदुत्वासाठी उभं राहून काम करणं सोपं नाही. शरद मोहोळ आणि कुटुंबानं हे काम केलं आहे. मात्र, शरद मोहोळ यांच्या खुनानंतर मीडियात त्यांच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यांची प्रतिमा चुकीची दाखवली जात आहे. मीडियानं हे टाळावं, अशी अपेक्षा राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या