मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nadurbar Bus Accident : नंदुरबारच्या शहाद्यात बसचा भीषण अपघात; चालकाचं नियंत्रण सुटताच बस उलटली

Nadurbar Bus Accident : नंदुरबारच्या शहाद्यात बसचा भीषण अपघात; चालकाचं नियंत्रण सुटताच बस उलटली

Apr 12, 2023, 09:05 AM IST

  • Nadurbar Bus Accident : नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहाद्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत बसमध्ये साखर झोपेत असलेले १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे.

नंदुरबारच्या शहाद्यात बसचा भीषण अपघात

Nadurbar Bus Accident : नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहाद्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत बसमध्ये साखर झोपेत असलेले १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे.

  • Nadurbar Bus Accident : नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या शहाद्यात बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत बसमध्ये साखर झोपेत असलेले १५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथे एका बसचा भीषण अपघातात झाला. सुरत-खरगोन ही बस पहाटेच्या सुमारास जात असतांना बसवरील चलकांचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकाला जाऊन धडकली आणि रस्त्यावर पलटी झाली. या बसमधील तब्बल १५ प्रवासी या अपघात जखमी झाले.  यातील एकाची प्रकृती ही चिंताजनक आहे. पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact check : मुंबई भाजपच्या निवडणूक प्रचार साहित्यात सोन्याची बिस्किटं? काय आहे सत्य?

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

Sanjay Raut : ८०० कोटींच्या भूखंड घोटाळ्यात एकनाथ शिंदे लाभार्थी; संजय राऊत यांचं थेट मोदींना पत्र

गुजरात राज्यातील सुरत येथून मध्य प्रदेशकडे ही बस जात होती. ही बस नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा येथील १३२ केवी सब स्टेशनजवळ आली असता या ठिकाणी बस चालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती की बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. एका प्रवाशाची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने शहादा येथील खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांची नावे अद्याप समजू शकली नाही.

अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जखमी नागरिकांना बाहेर काढले. काही वेळात पोलिस देखील आले. त्यांनी देखील जखमी नागरिकांना बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. दरम्यान या मार्गावर अपघात वाढले असून हे अपघात कमी करण्यासाठी उपाय योजना करणाची मागणी होत आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या