मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका; नांदेड, मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्यांची चाके थांबली

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका; नांदेड, मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्यांची चाके थांबली

Oct 30, 2023, 11:48 AM IST

    • Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामुळे नांदेड मधील बस आगारांनी एसटीची वाहतूक थांबवली आहे, अशी माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.
Maratha Reservation

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामुळे नांदेड मधील बस आगारांनी एसटीची वाहतूक थांबवली आहे, अशी माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.

    • Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यामुळे नांदेड मधील बस आगारांनी एसटीची वाहतूक थांबवली आहे, अशी माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.

नांदेड : राज्यात मराठा आंदोलन आता तीव्र करण्यात आले आहे. जालना, छत्रपती सांभाजीनगर, नांदेड, नाशिक आदी ठिकाणी सरकार विरोधात निषेध मोर्चे आणि आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला देखील बसला आहे. राज्यातील परिस्थिती बघता रविवार पासून नांदेड आगारातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची चाहूल, काही ठिकाणी पावसाचा अंदाज; असे असेल आजचे हवामान

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. नांदेड डेपोची बस नागपूरला जात असतांना पैनगंगेच्या पुलावर काही आंदोलकांनी ही बस पेटवून दिली होती. तर काही ठिकाणी एसटीवर दगड फेक करण्यात आली होती. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी बसच्या फेऱ्या बंड करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली. दरम्यान, एसटी वाहतूक बंद झाली असून यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी देखील नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ काही अज्ञात व्यक्तिंनी बस थांबवून पेटवली. रविवारी पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली असून यात बसचे नुकसान झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आता बस वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील ९ आगारातील ५४७ बसेसची वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या