मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये २५ वर्षीय तरूणानं विष पिऊन संपवलं जीवन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये २५ वर्षीय तरूणानं विष पिऊन संपवलं जीवन

Nov 13, 2023, 09:52 AM IST

    • Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून अनेक तरुणांनी या साठी आपले जीवन संपवले आहे. अशीच एक घटना उघडकीस आली असून एका तरुणाने विष पिऊन जीवन संपवले आहे.
Nanded news (HT_PRINT)

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून अनेक तरुणांनी या साठी आपले जीवन संपवले आहे. अशीच एक घटना उघडकीस आली असून एका तरुणाने विष पिऊन जीवन संपवले आहे.

    • Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून अनेक तरुणांनी या साठी आपले जीवन संपवले आहे. अशीच एक घटना उघडकीस आली असून एका तरुणाने विष पिऊन जीवन संपवले आहे.

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरून राण पेटले आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आता राज्याचा दौरा सुरू करणार आहे. एकीकडे आंदोलने सुरू असतांना अनेक तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. हे सत्र थांबतांना दिसत नाही. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. नांदेडमध्ये एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या केली आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथे ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! काही जिल्ह्यात बरसणार तर काही ठिकाणी कडाका वाढणार, असे असेल हवामान

दाजीबा रामदास कदम असे विष पिऊन जीवन संपवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री विष प्राशन केले. त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दाजीबाकडे सुसाईड नोट सापडली असून त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

Somvati Amavasya Yatra 2023 : खंडोबाच्या सोमवती यात्रेला सुरुवात; पुणे ग्रामीण हद्दीत वाहतुकीत बदल

दाजीबा याने मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग घेतला होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र, आरक्षण नसल्यामुळे त्याला यश मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. त्याच्यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली. मात्र, आरक्षण मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार विजय आवधान यांनी त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आरक्षण दिले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे १५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान, राज्याच्या दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या