मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नांदेड हादरलं! पोत्यात भरून तलवारी आणल्या अन् टोळक्यानं सपासप वार करून तरुणाला संपवलं

नांदेड हादरलं! पोत्यात भरून तलवारी आणल्या अन् टोळक्यानं सपासप वार करून तरुणाला संपवलं

Nov 07, 2023, 06:52 PM IST

  • Nanded crime news  : नांदेडमध्ये २० ते २५ जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर तलवारींनी हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

nanded crime news

Nandedcrime news : नांदेडमध्ये २० ते २५ जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर तलवारींनी हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Nanded crime news  : नांदेडमध्ये २० ते २५ जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर तलवारींनी हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नांदेडमध्ये गँगवॉरची एक भयंकर घटना समोर आली आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने पोत्यात भरून तलवारी आणल्या व तीन जणांवर सपासप वार केले. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शहरातील सराफा बाजारात घडली. सागर पवार असे मृताचे नाव आहे. तर केशव पवार असे हल्लेखोर टोळक्याच्या प्रमुखाचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईकरांचे हृदय नाजूक! तब्बल १७ हजार नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास; तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Fact Check: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रोड शोमध्ये पाकिस्तानचा झेंडा? हे खरं आहे काय?

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

गँगवॉरचा हा प्रकार सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नेहमी गजबजलेल्या सराफा बाजारात घडला. मृत सागर पवार डेली निड्स आणि फायनान्सच्या व्यवसायात आहे. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवारने सागरकडे खंडणी मागितली होती. खंडणी देण्यावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपी केशवने सागरवर वार करून त्याची हत्या केली.

केशव पवार आपल्या २० ते २५ साथीदारांसह रात्रीच्या सुमारास सागर यादवला शोधत सराफा बाजारात आला होता. टोळक्यानं पोत्यात तलवारी भरून आणल्या होत्या. सागर समोर दिसताच टोळक्याने एक एक हत्यार बाहेर काढत सागर यादव आणि त्याच्या भावासह अन्य एकावर हल्ला चढवला. तलवारीचे वार होऊनही जखमी अवस्थेत सागरचा भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाल्याने कसाबसा वाचला. सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांच्यावर तलवारीचे अनेक वार करण्यात आले.

या हल्ल्यात सागरचा तडफडून मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याघटनेने जुन्या नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

या प्रकरणी मुख्य आरोपी केशव पवारसह २० ते २५ जणांविरोधात हत्या,खंडणी आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या