मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Accident: नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकची भीषण धडक, अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू

Nanded Accident: नांदेडमध्ये आयशर आणि ट्रकची भीषण धडक, अपघातात पाच मजुरांचा जागीच मृत्यू

Sep 24, 2022, 10:21 PM IST

    • Nanded Accident: रेल्वेच्या कामासाठी आलेल्या ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात ( प्रतिकात्मक फोटो) (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Nanded Accident: रेल्वेच्या कामासाठी आलेल्या ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

    • Nanded Accident: रेल्वेच्या कामासाठी आलेल्या ५ मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

Nanded Accident: नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण ठार झाले आहेत. सोनारीफाटा करंजी जवळ दोन वाहनांची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी हिमायतनगर इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली, ही धकड इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कामगारांचा समावेश आहे.

बिहारमधून कामासाठी आलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला. हे सर्वजण रेल्वेच्या कामासाठी आले होते. तसंच हिमायतनगर परिसरात ते राहत होते. दिवसभर काम आटोपून ते रात्री त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी निघाले होते. त्यावेळी आयशर टेम्पोला एका सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बीडी भुसनुर, सहायक पोलिस निरीक्षक महाजन यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी करत आहेत. आयशर टेम्पोचा चालक हा भोकर इथला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या