मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! भर रस्त्यात तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून

Yavatmal murder : यवतमाळ हादरलं! भर रस्त्यात तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून

Oct 27, 2023, 02:38 PM IST

  • Yavatmal youth murder : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या युवकाचा भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

crime news

Yavatmal youth murder : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या युवकाचा भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Yavatmal youth murder : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे एका ऑटोरिक्षा चालवणाऱ्या युवकाचा भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Yavatmal youth murder : यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढीस लागल्या आहे. येथील आर्णीमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. येथील एका ऑटोरिक्षा चालक युवकाचा भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी दोन संशयित हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Babanrao Dhakne : संघर्षयोद्धा हरपला! पंडित नेहरूंचा सहवास लाभलेले माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन

अजय तिगलवाड असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Amol Muzumdar: भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेले अमोल मुझुमदार आहेत तरी कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोळवण येथील अजय हा आर्णी येथे रिक्षा चालवतो. गुरुवारी रात्री तो दुचाकीवरून त्याच्या मित्राला घेऊन आर्णी येथे आला होता. या वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी अजयवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अजय हा गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

अजयच्या खुनाची बातमी मिळताच आर्णीमध्ये ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी थेट रुग्णालयात जात गर्दी केली. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी केली. काही संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केला. पोलिसांनी नागरिकांना समजवून सांगत शांत केले. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या