Amol Muzumdar: भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेले अमोल मुझुमदार आहेत तरी कोण?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Amol Muzumdar: भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेले अमोल मुझुमदार आहेत तरी कोण?

Amol Muzumdar: भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झालेले अमोल मुझुमदार आहेत तरी कोण?

Published Oct 27, 2023 01:08 PM IST

Indian Women's Cricket Team new Coach: बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची नियुक्ती केली.

Amol Muzumdar
Amol Muzumdar

Amol Muzumdar Stats and career: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी अमोल मुझुमदार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुझुमदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, अमोल मुझुमदार कोण आहेत? भारतीय क्रिकेटला त्यांनी दिले? तसेच त्यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांच्या नियुक्ती बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रगती करत राहील. संघाने द्विपक्षीय आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. अमोल मुझुमदार यांच्यामुळे भारतीय संघाचे बळ आणखी वाढेल.

अमोल मुझुमदार यांनी २१ वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत १७१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ११ हजार घावा आहेत, ज्यात ३० शतक आहेत. त्यांनी १०० हून अधिक लिस्ट ए सामने आणि १४ टी-२० सामन्यांमध्येही प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आहेत. अमोल मुझुमदार आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली, ज्यामुळे त्याला नवीन तेंडुलकर या नावानेही ओळखले जात होते.

अमोल मुझुमदार यांनी बॉम्बेकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यात अमोल यांनी मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. मुझुमदारने १९९३-९४ हंगामात रणजी ट्रॉफी सामन्यात हरियाणा विरुद्ध २६० धावा केल्या. हा विक्रम अजय रोहराने २०१८ मध्ये मोडला.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे नव्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अमोल मुझुमदार म्हणाले की, "माझी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचा मला अत्यंत सन्मान आणि अभिमान आहे. बीसीसीआयने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ही मोठी जबाबदारी आहे. मी प्रतिभावान खेळाडूंसोबत काम करण्यास आणि त्यांना मार्गदर्शन करण्यास उत्सुक आहे. पुढील दोन वर्ष खूप महत्त्वाचे असतील, कारण या काळात दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहे."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग