मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Firecrackers Sale : मुंबईत बेकायदा फटाके विक्रीवर बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, व्यापारी नाराज

Firecrackers Sale : मुंबईत बेकायदा फटाके विक्रीवर बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, व्यापारी नाराज

Oct 20, 2022, 09:41 AM IST

    • Mumbai Firecrackers : मुंबईत विनापरवाना फटाकेविक्री करण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. दिवाळी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
Ban Sale Of Firecrackers Without License (HT)

Mumbai Firecrackers : मुंबईत विनापरवाना फटाकेविक्री करण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. दिवाळी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

    • Mumbai Firecrackers : मुंबईत विनापरवाना फटाकेविक्री करण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. दिवाळी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

Ban Sale Of Firecrackers Without License : कोरोना महामारी संपल्यानंतर आता दोन वर्षानंतर देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यामुळं दिवाळीआधीच अनेक शहरातील बाजारपेठा फुलल्या असून अनेक शहरांमध्ये फटाक्यांच्या दुकाना लागलेल्या आहेत. परंतु आता दिवाळीचा सण काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबई पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यात पोलिसांनी मुंबई शहरातील विनापरवाना फटाकेविक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळं आता व्यापाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

मुंबई पोलिसांनी फटाके विक्रीबाबत एक आदेश जारी केला असून त्यात मुंबईत विनापरवाना फटाकेविक्रीवर बंदी घालण्यात सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी जारी केलेल्या आदेशनुसार, लोकांना धोका, अडथळा किंवा नुकसान टाळण्यासाठी मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कुणीही फटाक्यांची विक्री करू नये, याशिवाय ज्या व्यापाऱ्यांकडे फटाक्यांचा परवाना आहे, अशाच व्यापाऱ्यांना फटाकेविक्रीची परवानगी असेल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

बेकायदा फटाकेविक्री करणारे व्यापारी सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नाहीत. त्यामुळं शहरातील सार्वजनिक ठिकाणी आग लागून धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं विनापरवाना फटाकेविक्रीवर पोलिसांनी बंदी घातली आहे. याशिवाय मुंबई महापालिका हद्दीतील माहुल टर्मिनल, भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम, बीडीयू प्लॉट एरिया, स्पेशल ऑईल रिफायनरी परिसराच्या ५० एकर क्षेत्रात फटाकेविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेला हा आदेश १४ नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे.

मुंबई पोलिसांच्या निर्णयामुळं फटाकेविक्रेते नाराज...

मुंबई पोलिसांनी बेकायदा फटाकेविक्रीवर बंदी घातल्यानं फटाके विक्रेते आणि फटाक्यांच्या व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळं व्यवसाय बुडालेला असताना यावर्षी ऐन दिवाळीतच फटाकेविक्रीवर बंदी घालण्यात आल्यानं व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या