मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime News : मतिमंद मुलीवर आळीपाळीनं बलात्कार, संतापजनक घटनेने मुंबई हादरली

Mumbai Crime News : मतिमंद मुलीवर आळीपाळीनं बलात्कार, संतापजनक घटनेने मुंबई हादरली

Sep 21, 2023, 08:03 AM IST

    • Mumbai Crime News Marathi : मुंबईत धावत्या टॅक्सीत एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Mumbai Crime News Marathi (HT_PRINT)

Mumbai Crime News Marathi : मुंबईत धावत्या टॅक्सीत एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

    • Mumbai Crime News Marathi : मुंबईत धावत्या टॅक्सीत एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Mumbai Crime News Marathi : मायानगरीत मुंबईतून अतिशय संतापजनक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका धावत्या टॅक्सीत मतिमंद मुलीवर दोन आरोपींनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरच्यांशी भांडणं करून दक्षिण मुंबईतून टॅक्सीत बसली होती. त्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरने दोन साथीदारांसह मुलीवर अत्याचार करत बलात्कार केला आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला शहरातील वाकोला परिसरात सोडलं. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आरोपी सलमान आणि प्रकाश पांडे या दोघांना अटक केली आहे. आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत राहणाऱ्या १४ वर्षीय मतिमंद मुलीचं घरच्यांसोबत भांडणं झाली होती. त्यानंतर रागाच्या भरात मुलीने घराजवळून टॅक्सी पकडली. याच संधीचा फायदा घेत आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार प्रकाश पांडे यांनी मतिमंद मुलीवर टॅक्सीत अत्याचार करत बलात्कार केला. मुलीने वाकोला परिसरात उतरल्यानंतर पोलिसांनी तिची विचारपूस केली. त्यावेळी तरुणीने घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज चेक करत तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास ही घडना घडली असून पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी आरोपींना दादर परिसरातून अटक केली आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाणे गाठलं आहे. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. पीडितेची प्रकृती स्थिर असून तिच्या अंगावर किरकोळ जखमा असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या