मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

Jul 07, 2023, 10:35 PM IST

  • Mumbai local train updates : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा असून या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

Mumbai mega block

Mumbai local train updates : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा असून या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

  • Mumbai local train updates : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा असून या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वेकडून रविवारी (९ जुलै) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी बाहेर फिरण्याचा बेत आखणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहा अन् मगच बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवा. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतआल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते विद्याविहार दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या गाड्या वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

कसा असेल मेगाब्लॉक -

  • विद्याविहार - ठाणे ५वी आणि ६वी लाईन सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत
  • ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाउन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान डाउन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा १० ते १५मिनिटे उशिरा पोहोचतील.
  • कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द
  • वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

 

हा मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुढील बातम्या