मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Megablock : मुंबईकरांनो सुट्टीचा बेत आखण्यापूर्वी जरा इकडं लक्ष द्या.. रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Megablock : मुंबईकरांनो सुट्टीचा बेत आखण्यापूर्वी जरा इकडं लक्ष द्या.. रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Jun 23, 2023, 11:27 PM IST

  • Mumbai local megablock updates : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर  रेल्वेमार्ग देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान काही लोकल रद्द केल्या आहेत, काही लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे. वाचा संपूर्ण वेळापत्रक..

Mumbai local megablock

Mumbai local megablock updates : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेमार्गदेखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणारआहे. या दरम्यान काही लोकल रद्द केल्या आहेत, काही लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे. वाचा संपूर्ण वेळापत्रक..

  • Mumbai local megablock updates : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर  रेल्वेमार्ग देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान काही लोकल रद्द केल्या आहेत, काही लोकलचा मार्ग बदलण्यात आला आहे. वाचा संपूर्ण वेळापत्रक..

Mumbai Local Megablock : मध्य आणि हार्बर रेल्वेवरील ओव्हर हेडवायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (२५ जून) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील रविवारी कोणताही ब्लॉक नसेल. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर (Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं, असं आवाहन रेल्वेमार्फत करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update: मुंबई, ठाण्यात आज उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरकून घ्या मतदान

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक वेळापत्रक -

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेमार्ग देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणारआहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मर्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजण्याच्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळातमाटुंगा ते मुलुंड दरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच या वेळेत सर्व लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. पुढे मुलुंड स्थानकावर ही वाहतूक पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ब्लॉकच्या काळात लोकल वाहतूक १५ मिनिटे विलंबाने धावेल.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकवेळापत्रक-

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.३४ ते दुपारी ०३.३६ पर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. मात्र नेरुळ ते खारकोपर सेवेवर मेगाब्लॉगचा कोणताही परिणाम होणार नाही.

पुढील बातम्या