मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Mega block : मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक; असं असेल वेळापत्रक

Mumbai Mega block : मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक; असं असेल वेळापत्रक

Sep 29, 2023, 09:09 PM IST

  • Mumbai Mega Block  : हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल  ३८  तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान नवीन बांधकामासाठी हा ब्लॉक असणार आहे.

Mumbai Mega Block

Mumbai Mega Block : हार्बरट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान नवीन बांधकामासाठीहाब्लॉक असणार आहे.

  • Mumbai Mega Block  : हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर तब्बल  ३८  तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान नवीन बांधकामासाठी हा ब्लॉक असणार आहे.

मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्त लोकल सोडून मुंबईकरांची १० दिवस सेवा  केल्यानंतर  मध्य रेल्वेनं आता जम्बो मेगाब्लॉकचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन २ नवीन लाईनच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

मेगाब्लॉक काळात बेलापूर ते पनवेल तसेच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नाही. ३० सप्टेंबर म्हणजेच शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून ते २ ऑक्टोरपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल शनिवारी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सीएसएमटी हून सुटेल. ही ट्रेन १० वाजून २२ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. त्याचबरोबर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि ११ वाजून  ५४  मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे स्थानकातून रात्री  ९ वाजून  ३६  मिनिटांनी सुटेल आणि १० वाजून २८ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. पनवेलहून ठाण्याकडे सुटणारी शेवटची लोकल ९ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि १० वाजून १२ मिनिटांनी ठाण्याला पोहोचेल.

मेगाब्लॉकनंतर लोकल सेवा पूर्ववत कधी होणार?

मेगाब्लॉकनंतर २ ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी सुटेल. ही लोकल १ वाजून २९ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. त्याचबरोबर  सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल पनवेलहून १ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. ही लोकल  २  वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी सुटेल. २ वाजून १६ मिनिटांनी लोकल पनवेलला पोहोचेल. तर पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं पहिली लोकल २ वाजून १ मिनिटांनी सुटेल आणि २ वाजून ५४ मिनिटांनी ठाण्यात दाखल होईल.

पुढील बातम्या