मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Building Collapse: चार मजली इमारत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू

Mumbai Building Collapse: चार मजली इमारत कोसळल्याने १८ जणांचा मृत्यू

Jun 28, 2022, 07:50 PM IST

    • मुंबईत कुर्ला भागातील नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री चार मजली इमारत कोसळून १८ जणांना मृत्यू झाला आहे.
कुर्ल्यात ४ मजली इमारत कोसळली (फोटो - एएनआय)

मुंबईत कुर्ला भागातील नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री चार मजली इमारत कोसळून १८ जणांना मृत्यू झाला आहे.

    • मुंबईत कुर्ला भागातील नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री चार मजली इमारत कोसळून १८ जणांना मृत्यू झाला आहे.

Kurla Building Collapse: मुंबईत कुर्ला भागात नाईक नगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत  कोसळल्याची घटना घडली आहे. यात १४ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले होते त्यातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ९ जखमींवर उपचार करून घरी सोडण्यात आले असून चार जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. आहे. जखमींपैकी तिघांवर राजावाडी रुग्णालयात तर एकावर सायन रुग्णालयात  उपचार सुरू आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरातील जर्जर झालेल्या इतर चार इमारतींना पाडण्याचे महापालिकेने आज आदेश दिले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट आशिष कुमार यांनी सांगितलं की, कुर्ल्यात नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली. यात २३ जण अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी दुपारपर्यंत सर्वांना बाहेर काढले होते. मृतांमध्ये अजय भोले पासपोर (वय ) 

मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत माहिती घेतली आहे. तसंच "इमारत दुर्घटनेतून सुखरुप बाहेर काढलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही" त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई महानगर पालिकेनं चार इमारतींना नोटीस पाठवली होती. तरीही त्या इमारतींमध्ये काही लोक राहत होते. साधारणपणे ८ ते १० कुटुंबे राहत होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना आवाहन केलं की, "बीएमसी जेव्हा नोटीस देईल तेव्हा जागा रिकामी करा, अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्या."

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या