मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malad Fire: मालाडमध्ये आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग; अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल

Malad Fire: मालाडमध्ये आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग; अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल

Mar 28, 2024, 03:58 PM IST

    • Mumbai commercial building Fire: मालाडच्या दफ्तरी रोड येथील व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली.
मालाड येथील आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली.

Mumbai commercial building Fire: मालाडच्या दफ्तरी रोड येथील व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली.

    • Mumbai commercial building Fire: मालाडच्या दफ्तरी रोड येथील व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने परिसरात खळबळ माजली.

Malad Fire News Today: मालाड पूर्व येथील दफ्तरी रोडवर असलेल्या आठ मजली व्यावसायिक इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गारमेन्टच्या दुकानाला आग लागल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील व्यावसायिक इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील गारमेन्टच्या दुकानाला आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब अग्निशमनदलाला याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमनदलाच्या ८ गाड्या घटना घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आले असून या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेसला आग

नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी मुंबई-गोरखपूर गोदान एक्स्प्रेसच्या एका डब्याला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली होती. आग लागल्याची माहिती मिळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमनदलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या