mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी-accident on jagbudi river bridge traffic jam on mumbai goa highway ratnagiri ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

mumbai goa highway accident : जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटल्यामुळं मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी

Mar 28, 2024 10:08 AM IST

Mumbai Goa highway accident : मुंबई-गोवा मार्गावर जगबुडी नदीच्या पुलावर मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण अपघात झाला. खत घेऊन जाणारा एक ट्रक पलटी झाला असून या मुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

 जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटला
जगबुडी नदीच्या पुलावर भीषण अपघात, खताचा ट्रक उलटला

Mumbai Goa highway accident : मुंबई-गोवा मार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला. एक खत घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याने खतांची पोती रस्त्यावर पसरली होती. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या पूलावरून वळवण्यात आली होती.

lok sabha election : मुंबईतील डॉक्टर, नर्सेसना निवडणूक ड्युटी; विरोध होताच प्रशासनाचे घूमजाव

मिळालेल्या माहितीनुसार भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज सकाळी एक खताचा ट्रक उलटून अपघात झाला. हा ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रकमध्ये खतांची पोती होती. भरधाव वेगात असलेल्या या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पुलावर पलटी झाला. यामुले ट्रकमधील खतांची पोती रस्त्यावर पसरले होते. यामुळे मुंबई गोवा मार्गावरील मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका पूर्णपणे बंद झाली.

NIA DG : मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती NIA ची धुरा! महाराष्ट्र एटीएसचे डीजी सदानंद दाते एनआयएचे नवे प्रमुख

रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रक आणि खतांची पोती बाजूला केली. मात्र, तरीसुद्धा वाहतूक ही विस्कळीत झाली होती. यामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी वाहने दुसऱ्या पुलावरून वळवण्यात आली. या आपघातमुळे होळीनिमित्त मुंबईहून कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. भरणे नका इथे मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.

या अपघातानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि खेड पोलिसांनी क्रेनच्या साह्याने हा ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू केले. गेल्या काही महिन्यातील जगबुडी नदीच्या पुलावरील हा चौथा अपघात आहे. पोटॅशियम सल्फेट घेऊन जाणारा १४ टायर असलेला हा ट्रक असून यात मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. यात चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे सजमते.