मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai dahi handi : दुदैवी.. दहीहंडी फोडताना २५ वर्षाचा गोविंदा मानवी मनोऱ्यावरून कोसळल्याने मारला लकवा

Mumbai dahi handi : दुदैवी.. दहीहंडी फोडताना २५ वर्षाचा गोविंदा मानवी मनोऱ्यावरून कोसळल्याने मारला लकवा

Sep 09, 2023, 06:24 PM IST

  • Dahi Handi 2023 : दहीहंडी फोडताना मानवी मनोऱ्यावरून कोसळून एका २५ वर्षीय तरुणाला लकवा मारला आहे. छातीपासून शरीराचा खालाचा भाग संवेदनाहीन झाला आहे.

Dahi Handi 2023

DahiHandi 2023 : दहीहंडी फोडताना मानवी मनोऱ्यावरून कोसळून एका २५ वर्षीय तरुणाला लकवा मारला आहे. छातीपासून शरीराचा खालाचा भाग संवेदनाहीन झाला आहे.

  • Dahi Handi 2023 : दहीहंडी फोडताना मानवी मनोऱ्यावरून कोसळून एका २५ वर्षीय तरुणाला लकवा मारला आहे. छातीपासून शरीराचा खालाचा भाग संवेदनाहीन झाला आहे.

मुंबईत गुरुवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे बनवताना १२४ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई व ठाण्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू हेत. काही किरकोळ जखमी गोविंदांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दहीहंडी फोडताना मुंबईत १०७ तर टाण्यात १७ गोविंदा जखमी झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

त्यातच मुंबईतून एक धक्कादायक बातमी आली आहे. दहीहंडी फोडताना मानवी मनोऱ्यावरून कोसळून एका २५ वर्षीय तरुणाला लकवा मारला आहे. छातीपासून शरीराचा खालाचा भाग संवेदनाहीन झाला आहे. या युवकावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरज कमद (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. सुरज गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी पथकात सामील होत आहे.

सुरजवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याला रात्री २ वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्याचे काका सचिन जाधव यांनी सांगितले की, मानवी मनोरे रचताना तो दुसऱ्या थरात होता. मात्र संतुलन बिघडल्याने वरच्या थरातील तरुण सुरजच्या अंगावर कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली. सूरजच्या आई-वडिलांचे कोरोना महामारीत निधन झाले असून त्याला दोन लहान भाऊ आहेत. ऑफिस बॉयचे काम करून तो कुटूंबाचे पालन पोषण करतो. घरातील एकमेव कमावता सूरज असल्याने त्याच्या कुटूंबाला धक्का बसला आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या शरीराच्या खालच्या भागाची काहीच हालचाल होत नाही. डॉक्टरांनी सांगितले की, त्याला कायमस्वरुपी लकवा मारण्याची शक्यता आहे. त्याच्यावर शनिवारी दोन ते तीन तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. याद्वारे खांद्याचे पाठीच्या कण्याचे फ्रॅक्चर ठीक केले गेले मात्र, या शस्त्रक्रियेने कदम यांच्या न्यूरोलॉजिकल रिकव्हरीमध्ये मदत होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या