मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, दुपारी मुलाखत अन् सायंकाळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, दुपारी मुलाखत अन् सायंकाळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध

Jan 18, 2024, 10:35 PM IST

  • Mpsc Exam Merit List : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

mpsc exam 2022 final result declared

Mpsc Exam Merit List : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

  • Mpsc Exam Merit List : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात विनायक पाटील यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

एमपीएससी परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना खुशखबर असून राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंतची राज्यसेवेची सर्वात मोठी म्हणजे ६१३ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. 

ट्रेंडिंग न्यूज

Fact Chack:मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईंच्या रोड शोमध्ये पाकिस्तान झेंडा ? व्हायरल व्हिडिचे सत्य उघड

Bank Holidays : बँकेची कामे आताच उरकून घ्या; ‘या’ कारणांमुळे पुढच्या आठवड्यात ४ दिवस बँका बंद

Mumbai Pune expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने प्रवास करताय? शनिवारी व रविवारी 'या' वेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक

Pune Crime News : पुण्यात मुली असुरक्षित! आधी ड्रग्जसोबत दारु पाजली नंतर लॉजवर नेऊन केले कांड! दोघींवर बलात्कार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रमी वेळेत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. आज  (१८  जानेवारी २०२४)  गुरुवारीच मुख्य परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली. त्याच दिवशी काही तासातच सायंकाळच्या सुमारास अंतिम निकाल जारी करण्यात आला आहे.

राज्यसेवेच्या  ६१३ पदांसाठी २०२२ साली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून अंतिम १८०० उमेदवार हे मुलाखतीसाठी निवडण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखतीचा शेवटचा टप्पा हा गुरूवारी पार पडला आणि त्याच दिवशी संध्याकाळी  फायनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीषक, तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती राबवली गेली. मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या परीक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आहे.  विनायक पाटीलला ६२२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनंजय पाटीलला ६०८ गुण मिळाले. पूजा वंजारी राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. तिला ५७०.२५ गुण मिळाले आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या