मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pratap Patil: खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या गाडीची तोडफोड! गावबंदी असूनही प्रवेश केल्यानं मराठा आंदोलक आक्रमक

Pratap Patil: खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या गाडीची तोडफोड! गावबंदी असूनही प्रवेश केल्यानं मराठा आंदोलक आक्रमक

Oct 27, 2023, 10:35 AM IST

  • MP Pratap Patil car vandalized: मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. अनेक पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. असे असतांना खासदार प्रताप पाटील चिखlलीकर हे अंबुलगा गावात केले असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

MP Pratap Patil car vandalized

MP Pratap Patil car vandalized: मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. अनेक पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. असे असतांना खासदार प्रताप पाटील चिखlलीकर हे अंबुलगा गावात केले असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

  • MP Pratap Patil car vandalized: मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. अनेक पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. असे असतांना खासदार प्रताप पाटील चिखlलीकर हे अंबुलगा गावात केले असताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

नांदेड : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे. मराठा आंदोलकांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यात गावात पुढाऱ्यांना बंदी असतांना देखील खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले असता, यावेळी संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Mumbai Market committee: मराठा आरक्षणासाठी आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद; जरांगेंना पाठिंबा

सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत देऊनसुद्धा सरकारने कोणतेच पावले उचलली नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा जालना येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने आम्हाला फसवले असल्याची टीका करत जो पर्यन्त आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आता राज्यभरतून पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गांवबंदी असताना देखील खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. यावेळी आंदोलकांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची रात्री तोडफोड केली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. खासदारांच्या सोबत असलेल्या पोलिसांनी तणाव निवळण्यासाठी तातडीने हस्तक्षेप केला. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेत आंदोलकांनी तीन वाहनांची तोडफोड केल्याने नुकसान झाले.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या