मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विनायक मेटेंचा अपघात कशामुळे? फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती

विनायक मेटेंचा अपघात कशामुळे? फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती

Aug 22, 2022, 11:19 AM IST

    • विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना यावर सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो - राहुल सिंग)

विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना यावर सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला.

    • विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना यावर सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर अनेकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर याप्रकरणची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. हाच मुद्दा राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना यावर सरकार काय उपाययोजना करणार असा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटलं की, विनायक मेटे यांचा अपघात हा चालकाचा अंदाज चुकल्याने झाला. मेटे यांचा मृत्यू जागीच झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. यासंदर्भात आता यंत्रणा बदलण्याची गरज आहे. अपघाताचे लोकेशन न कळल्याने मदत पोहोचण्यासाठी उशीर झाला असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

वर्षा गायकवाड यांनी महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर सरकारने चौकशी करणार असल्याचं सांगितलं. पण इतर महामार्गावरही अपघात होतायत. खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. कोकणातल्या रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. याबाबत सरकार धोरणात्मक कोणते निर्णय घेणार असं वर्षा गायकवाड यांनी विचारले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नीकडून उपस्थित करण्यता आल्या. मेटे यांचा चालक ओव्हरटेक करताना अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करत असताना ही घटना घडली आहे. याबद्दल सविस्तर माहिती समोर आल्यानंतर बोलता येईल असंही त्यांनी सांगितले. विनायक मेटे यांच्या चालकाने फोन केल्यानतंर वेळेत मदत पोहोचू शकली नाही ही बाब गंभी आहे. चालकाने दिलेल्या माहितीनंतर नवी मुंबई आणि रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते, मात्र अपघाताचे लोकेशन कळू शकत नव्हते. त्यामुळे आता यंत्रणा बदलण्याची गरज असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुढील बातम्या