मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 22 August 2022 Live : दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Live Blog

Marathi News 22 August 2022 Live : दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Aug 22, 2022, 05:27 PMIST

Marathi News Live Updates : राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.

Aug 22, 2022, 05:25 PMIST

Eknath Shinde: दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दहीहंडी कार्यक्रमात जखमी झालेल्या गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचारासह त्यांचा विमा उतरविण्याच्या निर्णयाचे दहिहंडी समन्वय समितीने स्वागत केले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष महाजन, आमदार प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, डॉ. बालाजी किणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Aug 22, 2022, 04:19 PMIST

Balasaheb Thorat: महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी सरकार काय करतेय?; बाळासाहेब थोरात यांचा सवाल

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का ? किंवा त्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे.

Aug 22, 2022, 03:53 PMIST

शुभमन गिलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक 

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात ८२ चेंडूत शतक पूर्ण केले. शुभमनचा हा नववा आंतरराष्ट्रीय वनडे सामना आहे.

<p>shubman gill</p>
shubman gill

Aug 22, 2022, 01:09 PMIST

NCP: विधानभवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली.

Aug 22, 2022, 12:12 PMIST

Pune rain update: खडकवासला, पानशेत व वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

पुण्यातील खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता ५ हजार ५६४ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी, एस आवाहन सहायक अभियंता ज. स. भंडलकर यांनी केले आहे.

<p>पुणे न्यूज&nbsp;</p>
पुणे न्यूज&nbsp;

Aug 22, 2022, 12:07 PMIST

Sanjay Raut : संजय राऊतांचा दिलास नाहीच; पाच सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ!

Sanjay Raut In Custody : शिवसेना नेते संजय राऊतांना पत्राचाळ प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर आता तिसऱ्यांदा कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आज राऊतांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणी कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळं आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Aug 22, 2022, 11:56 AMIST

Govind Pansare Case : कोर्टाच्या आदेशानंतर कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाचा तपास ATS कडे!

Govind Pansare Murder Case : जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांच्या दहशतवादी पथकाकडे देण्यात आला आहे. याआधी या प्रकरणाचा तपास सीआडीकडे होता, परंतु पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयानं सीबीआयच्या तपासावर नाराजी व्यक्त करत हा तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

Aug 22, 2022, 11:41 AMIST

Maharashtra Assembly Session: विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा डिवचले!

ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा... पन्नास खोके, माजलेत बोके... पन्नास खोके, एकदम ओके... ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी... स्थगिती सरकार हाय हाय... गद्दारांचं सरकार हाय हाय!!!... आले रे आले गद्दार आले... अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

Aug 22, 2022, 11:34 AMIST

गडचिरोलीत शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणाऱ्या बसचा अपघात

गडचिरोलीत शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा लगाम मार्गावर अपघात झाला. बसवरचे नियंत्रण सुटल्याने ती झाडावर आदळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते अशी माहिती समजते.

Aug 22, 2022, 11:29 AMIST

Sanjay Raut : संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. न्यायालयाने आता पुन्हा एकदा संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

Aug 22, 2022, 11:11 AMIST

OBC Reservation: ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर

ओबीसी आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला आहे. सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे. पाच आठवडे आता ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आरक्षणावर कोणताही निर्णय होणार नाही.

Aug 22, 2022, 10:55 AMIST

Pune Rain update : पुण्यातील वरसगाव धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ४५८ क्यूसेक विसर्ग वाढवून सकाळी ८ वाजता ३ हजार २३४ क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी केले.

Aug 22, 2022, 09:37 AMIST

Bihar Politics : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक; पोलिसांकडून १३ आरोपींना अटक

Bihar CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. ते पाटण्यात एका कार्यक्रमासाठी जात असताना काही लोकांनी त्यांचा विरोध करत त्यांच्या दिशेनं दगडफेक करायला सुरुवात केली, त्यात नितीश यांच्या वाहनाच्या काचा फुटल्या असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १३ आरोपींना अटक केली आहे.

Aug 22, 2022, 09:25 AMIST

Share Market: शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला असून सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला आहे. त्यामुळं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा ६० हजारच्या आता आला आहे. निफ्टीही १३३ अंकांनी घसरून १७,६२७ वर ट्रेड करत आहे.

Aug 22, 2022, 09:16 AMIST

शेतकऱ्यांची 'महापंचायत', दिल्लीच्या तिन्ही सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था

दिल्लीत जंतर मंतरवर शेतकऱ्यांनी किसान महापंचायतीचे आयोजन केले आहे. बेरोजगारीविरोधात शेतकरी आंदोलनासाठी आता जंतर मंतरवर पोहोचत आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत येणाऱ्या गाझीपूर, सिंघू आणि टिकरी या तीन सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Aug 22, 2022, 08:54 AMIST

Pune News : केंद्रीय कामगार मंत्र्यांची कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट

पुणे : केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह बिबवेवाडी येथील कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली.  यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महामंडळाचे विभागीय आयुक्त प्रणयकुमार सिन्हा, वैद्यकीय अधीक्षक इम्मान्यूयेलू कोटा, प्र. उपनिदेशक हेमंत कुमार पांडेय आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री यादव यांच्या हस्ते रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आमदार मिसाळ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.

Aug 22, 2022, 08:20 AMIST

Mumbai Local: करीरोड स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत

करीरोड स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे.

Aug 22, 2022, 08:09 AMIST

जंतर मंतरवर किसान महापंचायत; दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

दिल्लीत जंतर मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन आज होणार आहे. यापार्श्वभूमीवर सिंघू, गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Aug 22, 2022, 07:50 AMIST

Monsoon Session : राज्याच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष बघायला मिळाला. आता तिसऱ्या दिवशी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था या मुद्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात.

Aug 22, 2022, 07:44 AMIST

Earthquake: राजस्थानला भूकंपाचे धक्के, ४.१ रिश्टर स्केल तीव्रता

राजस्थानला मध्यरात्री दोनच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. बिकानेरपासून उत्तर पश्चिमेकडे २३६ किमी अंतरावर याचा केंद्रबिंदू होता. तसंच ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंचापी खोली १० किमी खोल इतकी होती अशी माहिती देण्यात आली आहे.

    शेअर करा