मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सत्ता व कायद्याचा गैरवापर, दहशतवाद्यांच्या विरोधातील कायदे देशभक्तांसाठी; संजय राऊतांचा निशाणा

सत्ता व कायद्याचा गैरवापर, दहशतवाद्यांच्या विरोधातील कायदे देशभक्तांसाठी; संजय राऊतांचा निशाणा

Dec 30, 2022, 06:09 PM IST

  • Sanjay raut criticized on BJP government : संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, देशात सत्ता  व कायद्याचा गैरवापर होत आहे. अशी वेळ शुत्रंवरही येऊ नये.  

संजय राऊत

Sanjay raut criticized on BJP government : संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, देशात सत्ता व कायद्याचा गैरवापर होत आहे. अशी वेळ शुत्रंवरही येऊ नये.

  • Sanjay raut criticized on BJP government : संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, देशात सत्ता  व कायद्याचा गैरवापर होत आहे. अशी वेळ शुत्रंवरही येऊ नये.  

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay raut)  यांनी आज नागपुरात जाऊन माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या तपास यंत्रणांच्या गैरवापरावर जोरदार टीका केली. केंद्र सरकार सत्ता व कायद्याचा गैरवापर करत आहे, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. असा आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. ३० वर्षांहून अधिक काळ ते सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केलं असून विदर्भाचं नेतृत्व केलं आहे. मी, अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड व दिल्लीतील काही नेते यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्याचा गैरवापर करण्यात आला. सत्तेचा आणि कायद्याचा हा गैरवापर आहे. परंतु कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही आमच्या तुरुंगातून सुटलो आहे. 

दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणारे, दहशत वाढवण्यास मदत करणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी मनी लाँड्रिंगचा कायदा तयार करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील कायदे देशभक्तांसाठी वापण्यात आले. आमच्या सारखे राष्ट्रभक्त जर तुम्हाला दहशतवादी वाटत असतील तर तुम्हाला संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील. असे हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अनिल देशमुख यांच्या जामीनावेळी न्यायालयाने जे निरिक्षण नोंदवले आहे, ते महत्वाच आहे. माझ्या जामीनावेळी जी निरिक्षण केली तीही महत्वाची आहेत. सध्या सत्ताधारी अमानूष वागत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 

अनिल देशमुख ज्या संकटातून गेले त्या संकटातून मी देखील गेलो. असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये असे आम्ही म्हणतो. अनेक वर्षे आमच्या हातात सत्ता होती. परंतु आम्ही आमच्या शत्रूशीही इतक्या निर्घृणपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाहीत. या देशातल्या न्याय व्यवस्थेमध्ये असे काही रामशास्त्री आहेत, ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा किंवा लोकशाहीचा स्तंभ मजबूत आहे, असे वाटत असल्याचे राऊत म्हणाले.

पुढील बातम्या