मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : ‘पक्षांतरानंतर रक्तांतर केल्यानं संघाचा रेशमी किडा शिंदेंच्या कानात वळवळतोय’

Sanjay Raut : ‘पक्षांतरानंतर रक्तांतर केल्यानं संघाचा रेशमी किडा शिंदेंच्या कानात वळवळतोय’

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 29, 2022 12:02 PM IST

Eknath Shinde RSS Office Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिल्यामुळं शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Sanjay Raut On Eknath Shinde RSS Office Visit Nagpur Today
Sanjay Raut On Eknath Shinde RSS Office Visit Nagpur Today (HT)

Sanjay Raut On Eknath Shinde RSS Office Visit Nagpur Today : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपत आलेलं असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयास भेट देत माजी सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधीला आदरांजली वाहून त्यांना वंदन केलं आहे. त्यामुळं आता यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर कडक शब्दात टीका केली असून यावरून आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी रेशिमबागेतील संघाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानात संघ विचारांचा रेशमी किडा वळवळत आहे. येत्या काही दिवसांत आता ते काळी टोपी आणि हाफ पॅंटही घालून येतील. शिंदेंनी पक्षांतर केलं पण इतक्या लवकर रक्तांतर होईल, असं वाटलं नव्हतं. अशा स्पष्ट आणि कठोर शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

शिवसेना भवनात कुणाचा बाप येऊ शकत नाही- राऊत

मुंबईतील शिवसेनाभवन हे बाळासाहेबांचं आहे. तिथं कुणाचा बाप येऊ शकत नाही. शिंदे गटाचे नेते मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयात घुसले होते. शिंदे गटाचे हे घुसखोर नेते सध्या कुठेही घुसत असून त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात भाजपवाले कधी घुसतील हे कळायचं नाही, असं म्हणत राऊतांनी पालिकेतील शिवसेना आणि शिंदे गटाच्या राड्यावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point