मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : सुरेश जैन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते, पण… राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Raj Thackeray : सुरेश जैन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते, पण… राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट

Jan 24, 2023, 11:13 AM IST

  • Raj Thackeray on Babasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची काल जन्मदिवस झाला. या निमित्त राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणी सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray on Babasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची काल जन्मदिवस झाला. या निमित्त राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणी सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Raj Thackeray on Babasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची काल जन्मदिवस झाला. या निमित्त राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणी सांगत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सोमवारी ९७ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत मोठा गौप्यस्फोट केला. यात त्यांनी १९९९ मध्ये झालेल्या सत्ता संघर्षा बाबत मोठे विधान केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगून गौप्यस्फोट केला. राज्यात १९९९ मध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षा बाबत त्यांनी मोठे विधान केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, १९९९ मध्ये सत्तासंघर्ष सुरु होता. भाजपचे प्रकाश जावडेकर दुपारी साडे तीन वाजता मातोश्रीवर आले. त्यावेळी बाळासाहेब झोपले होते. जावडेकर यांनी त्यांना भेटायचे आहे, असे मला सांगितले. परंतु ते विश्रांती घेत आहेत. त्यांना आता भेटता येणार नाही असे मी सांगितले. मात्र, त्यावर जावडेकर यांनी सुरेश जैन युतीचे मुख्यमंत्री होणार आहेत व ते आमदारांची जमवाजमव करणार आहेत, असा त्यांना निरोप द्या, असे सांगितले. मी बाळासाहेबांना झोपेतून उठवून हा निरोप दिला, तर जैन यांचे नाव ऐकताच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल, चल जा, असे ठणकावून सांगून पुन्हा ते झोपी गेले. इतके कडवट मराठी अभिमानी बाळासाहेब होते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या