मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महिला पोलिसाशी गैरवर्तन; मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर कारवाईचे आदेश

महिला पोलिसाशी गैरवर्तन; मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर कारवाईचे आदेश

May 04, 2022, 03:53 PM IST

    • मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.
संदीप देशपांडे

मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

    • मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत.

महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गृहखात्यानं दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 'मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली आहे. सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडे हे मनसेच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असतात. भोंग्यांच्या विरोधात आज होत असलेल्या आंदोलनासाठीही ते रस्त्यावर उतरले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस गाडीत बसवण्यासाठी घेऊन जात होते. संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालत गेल्यानंतर अचानक हे दोघेही खासगी कारमध्ये बसले आणि कार भरधाव निघून गेली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. या सगळ्या गडबडीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.

यामुळं देशपांडे व धुरी या दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी देखील या दोघांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या