मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला का गेले? गडकरींनी सांगितलं सत्य, म्हणाले...

Nitin Gadkari : महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला का गेले? गडकरींनी सांगितलं सत्य, म्हणाले...

Nov 05, 2022, 08:59 AM IST

    • Nitin Gadkari On Vedanta Foxconn : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari (MINT_PRINT)

Nitin Gadkari On Vedanta Foxconn : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    • Nitin Gadkari On Vedanta Foxconn : महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Nitin Gadkari On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा-एअरबससह बल्कड्रग हे तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच नागपूरातला एक प्रोजेक्टही तेलंगणात गेला आहे. त्यामुळं आता राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

मुंबईत 'इंडिया टूडे'च्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, कोणत्याही राज्यात औद्योगिक प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर त्याबाबतचे कोणतेही अधिकार राज्य सरकारच्या हातात नसतात. याबाबत कोणत्या राज्यात गुंतवणूक करायची, याचा सर्वस्वी अधिकार उद्योजकांना असतो, असं म्हणत गडकरींनी राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्यावर बचावात्मक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनेक औद्योगिक कंपन्या आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मर्सिडिज कंपनीचा मोठा प्रोजेक्ट पुण्यात आला आहे. आधी मुंबई-पुण्यातच विकास होत असल्याचं बोललं जायचं. परंतु आता मराठवाडा आणि विदर्भातही औद्योगिक प्रकल्प येत असल्याचं गडकरी म्हणाले.

औद्योगिक प्रकल्पांसाठी कोणत्याही नेत्यांवर अथवा राज्य सरकारांवर दबाव नाहीये. काही लोक कारण नसताना यावरून वाद घालत आहेत आणि मीडियाही अशा घडामोडींना प्रतिसाद देत असल्याचंही गडकरी म्हणाले. दरम्यान राज्यातील चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आता केंद्र सरकारनं पुण्यात दीड हजार कोटींचा प्रकल्प मंजूर केला आहे. याशिवाय दोन दिवसांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे २२५ प्रकल्पांना मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे.

पुढील बातम्या