मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Milk Price: सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री, दुधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

Milk Price: सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री, दुधाच्या किंमतीत दोन रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

Feb 01, 2023, 07:50 AM IST

  • Milk Price Today: महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने आजपासून गायीच्या दुधाच्या किंमतीत प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे महागाईची आधीच झळ सोसणाऱ्या सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

Milk Price Today (HT)

Milk Price Today: महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने आजपासून गायीच्या दुधाच्या किंमतीत प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे महागाईची आधीच झळ सोसणाऱ्या सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

  • Milk Price Today: महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने आजपासून गायीच्या दुधाच्या किंमतीत प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे महागाईची आधीच झळ सोसणाऱ्या सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

Milk Price Hike: महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने आजपासून गायीच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेने प्रतिलीटर दुधाच्या किंमतीत दोन रुपयांनी वाढ केली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात वाढ करण्यात आल्याचे हाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

महाराष्ट्रातील प्रमुख २२ खासगी आणि सहकारी दूध संस्थांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत दूध खरेदी दर, दूध पिशवी पॅकिंग आणि आणि दुधाच्या वाहतुकी खर्चाबाबत चर्चा झाली.राज्यातील बाजारपेठेत परराज्यातील दूध संघांची विक्री वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ फेब्रुवारी म्हणजेच आजपासून लागू केली जाणार आहे. दरम्यान, काही दूध संस्थांनी ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून मुख्य वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दूध संस्थांचे विक्री मूल्य स्थिर राहण्याची शक्यता आहे.

सध्या देशभरात दुधाची टंचाई आहे. दुधापासून तयार होणाऱ्या पावडर, बटर आणि इतर पदार्थाच्या किंमती वाढल्या आहेत. पावडर आणि बटरचे दर वाढल्याने दूध खरेदी दरातही वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीच्या सोनाई दूध संघाने २१ जानेवारीपासून गाय दूधात प्रतिलीटर एक रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या