मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  निसर्गाचा अचूक अंदाज बांधण्यात हवामान खात्याने केली क्रांती, शेतीसाठी तारणहार

निसर्गाचा अचूक अंदाज बांधण्यात हवामान खात्याने केली क्रांती, शेतीसाठी तारणहार

Mar 23, 2022, 12:21 PM IST

  • आज 'जागतिक हवामान दिन' आहे. नैसर्गिक आपत्तींविषयी अनेकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी केला जातो. या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळं एकप्रकारे हवामान क्षेत्रात मोठी क्रांती घडून आलेली आहे.

agriculture

आज 'जागतिक हवामान दिन' आहे. नैसर्गिक आपत्तींविषयी अनेकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी केला जातो. या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळं एकप्रकारे हवामान क्षेत्रात मोठी क्रांती घडून आलेली आहे.

  • आज 'जागतिक हवामान दिन' आहे. नैसर्गिक आपत्तींविषयी अनेकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी केला जातो. या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. त्यामुळं एकप्रकारे हवामान क्षेत्रात मोठी क्रांती घडून आलेली आहे.

जगभरात सातत्यानं मोठ्या प्रमाणात होणारे हवामानबदल हा मानवजातीसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. परंतु अनेकदा हवामान खात्यानं नैसर्गिक आपत्तींविषयी अचूक अंदाज देत होणारं संभावित नुकसान टाळण्यास मदत केली आहे. आज जगभरात २३ मार्च हा दिवस 'जागतिक हवामान दिन' म्हणून साजरा केला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

मागील काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळं आणि इतर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं अनेकदा भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ, चक्रिवादळ यासह पावसाचा इशारा अशा अनेक नैसर्गिक हालचालींविषयी हवामान खात्यानं माहिती दिली आहे. त्यामुळं होणारं संभावित नुकसान कमी करुन बचावकार्यात काम करता येतं. निसर्गाच्या लहरीपणाबाबत नागरिकांनी जागरुक व्हावं, हा देखील प्रयत्न हवामान खात्याचा असतो. आतापर्यंत जगभरातील विविध हवामान खात्यांनी वर्तवलेल्या अंदाजमुळं आरोग्य आणि शेती व्यवयायात होणारं मोठं नुकसान टाळता आलेलं आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे आरोग्य आणि शेती क्षेत्रालाच होत असते.

हवामान दिवस साजरा करण्याचा उद्देश काय?

१९५० साली जागतिक हवामान संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात आहे. ही संस्था तयार करण्यासाठी ज्या ३१ देशांनी पुढाकार घेतला त्यात भारताचाही समावेश होता. हवामानाची स्थिती जाणून घेणे आणि त्याचा परिणाम सकारात्मक की नकारात्मक याचा विचार करुन जनजागृती करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

शेतीसाठी क्रांतीकारक?

भारतातील शेती व्यवसाय हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून आहे. शेतकरी रब्बी आणि खरीप हंगामातील बहुतेक पीक हे पावसाच्या भरवशावर करतात. परंतु लहरी निसर्गामुळं अनेकदा शेतकऱ्यांच्या हातात निराशा येते. त्याचमुळं हवामान खात्याच्या मदतीनं भविष्यातील हवामानाचा अंदाज घेऊन त्या संबंधित पिक लागवड, फवारणी, पिकाला पाणी देणं आणि शेतीतील इतर महत्त्वाची कामं करणं सोपं झालं आहे. हवामान खात्याचा भारतातील शेती उद्योगावर सर्वात जास्त प्रभाव पडल्यामुळं शेतकऱ्यांनाही त्यातून फायदा झाला. त्यामुळं हवामान खात्याच्या माध्यमातून ही शेती क्षेत्रात झालेली क्रांतीच म्हणता येईल.

संकटांवर उपाययोजना काय?

संकट आल्यानंतर उपाययोजना करुन उपयोग नाही तर ते येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात, हे या संस्थेचं प्रमुख उद्देश्य होतं. Early Warning and Early Action या धोरणाद्वारे २०२२ या वर्षातील टार्गेट ठरवण्यात आले असून संकटकाळात नागरिकांनी काय करायला हवं, याबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.

पॅरिस कराराची भूमिका काय?

जगभरात वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकारानं पॅरिस करार करण्यात आला. या करारामध्ये जगभरातील २०० देशांनी सहभाग घेतला. यात जगभरातील तापमान हे २.० अंश सेल्सिअसपर्यंत आणण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर या कार्यासाठी श्रीमंत राष्ट्रांनी गरिब राष्ट्रांना मदत करायची असंही धोरण यात आखण्यात आलं होतं. परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या करारातून माघार घेतली होती, आता काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पॅरिस करारामध्ये पुन्हा सहभागी होत असल्याची घोषणा केली होती.

दिवस कसा साजरा केला जातो?

२३ मार्चला जगभरातील सर्वच देशांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. हवामान आणि नैसर्गिक आपत्तीविषयी लोकांना माहिती देण्यात येते. हवामान दिनाच्या दिवशी शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयं अशा अनेक ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारसुद्धा याबाबत जनजागृती घडवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत असतात.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या