मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  balasaheb thackeray : उद्धव ठाकरेंसाठी दुसरा बंगला आहे, ‘मातोश्री’ हे बाळासाहेबांचं स्मारक व्हावं; भाजपची मागणी

balasaheb thackeray : उद्धव ठाकरेंसाठी दुसरा बंगला आहे, ‘मातोश्री’ हे बाळासाहेबांचं स्मारक व्हावं; भाजपची मागणी

Nov 17, 2023, 11:40 AM IST

  • balasaheb thackeray and Matoshree bungalow : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजपनं एक महत्त्वाची मागणी केली असून त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Balasaheb Thackeray memorial

balasaheb thackeray and Matoshree bungalow : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजपनं एक महत्त्वाची मागणी केली असून त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • balasaheb thackeray and Matoshree bungalow : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजपनं एक महत्त्वाची मागणी केली असून त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Balasaheb Thackeray death anniversary : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन असून त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसैनिकांची रीघ लागली आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. सर्वपक्षीय नेते बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. आजच्या दिवसाचं औचित्य साधून भाजपनं एक महत्त्वाची मागणी केली आहे. 'मातोश्री' हे निवासस्थान बाळासाहेबांचं स्मारक म्हणून जनतेसाठी खुलं करावं अशी मागणी भाजपनं केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट केली आहे. ‘राम कदम यांनी स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. अभिवादन करतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन, हजारो शिवसैनिक अभिवादनासाठी शिवतीर्थावर

‘ज्या मातोश्री बंगल्यात स्वर्गीय बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. खऱ्या अर्थानं तीच वास्तू देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. बाळासाहेबांनी वापरलेल्या वास्तूपासून त्यांचं ऑफिस, त्यांची राहण्याची खोली सर्व काही प्रेरक आहे. तेच बाळासाहेबांचं खरं जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी का खुलं नाही?, असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.

बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाची ही भावना

‘मातोश्रीची वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुली व्हायला हवी. उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी मातोश्री-२ झालाच आहे. त्यामुळं त्यांनी आता कोणतेही सबब न देता मातोश्री बंगला जनतेसाठी खुला करावा. बाळासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाची ही भावना आहे,’ असं कदम यांनी म्हटलं आहे.

मग महापौर बंगल्याचं काय?

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं स्मारक व्हावं अशी मागणी होऊ लागली होती. सर्व पक्षीयांचा त्यांना पाठिंबा होता. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना मुंबईतील दादर येथील महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान भायखळ्याला हलविण्यात आलं होतं. असं असताना आता भाजपनं ‘मातोश्री’ बंगला हेच स्मारक व्हावं, अशी मागणी केल्यामुळं भुवया उंचावल्या आहेत.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या