मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : मराठी म्हणून मलाही नाकारलं गेलं होतं मुंबईत घर; पंकजा मुंडे यांनी सांगितला अनुभव

Pankaja Munde : मराठी म्हणून मलाही नाकारलं गेलं होतं मुंबईत घर; पंकजा मुंडे यांनी सांगितला अनुभव

Sep 29, 2023, 11:23 AM IST

  • Pankaja munde on marathi manoos in mumbai : मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही हे सत्य आहे आणि दुर्दैवी आहे, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Pankaja Munde (HT_PRINT)

Pankaja munde on marathi manoos in mumbai : मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही हे सत्य आहे आणि दुर्दैवी आहे, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

  • Pankaja munde on marathi manoos in mumbai : मराठी माणसाला मुंबईत घर मिळत नाही हे सत्य आहे आणि दुर्दैवी आहे, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Pankaja Munde on marathi mumbai issue : मराठी माणसांना मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये घरं नाकारली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर खळबळ उडाली आहे. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षानं यावर जाहीर भूमिका मांडलेली नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत असतानाच आता खुद्द भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीच स्वत:ला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. केवळ मराठी म्हणून मलाही घर नाकारण्यात आलं होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

तृप्ती देवरुखकर या मुलुंडमधील एका सोसायटीत घर पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 'महाराष्ट्रीयन्स नॉट अलाउड' असं म्हणत त्यांना घर नाकारण्यात आलं व त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप देवरुखकर यांनी केला होता. त्यामुळं मुंबईतील मराठी माणसाच्या परवडीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांनी स्वत:चा अनुभव सांगितला आहे.

'भाषा आणि प्रांतवादाला माझा विरोध आहे. माझ्या राजकीय कारकीर्दीत मी कधीही तशी भूमिका घेतली नाही. भाषा, लिपी याबद्दल मी स्वत: कधीही कुणावर सक्ती केली नाही. मात्र, एका मराठी महिलेची व्यथा मी पाहिली. मराठी म्हणून तिला घर नाकारलं गेलं हा प्रकार पाहून मी अस्वस्थ झाले. माझं सरकारी घर सोडल्यानंतर जेव्हा मी घर शोधत होते, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला होता. मराठी लोकांना आम्ही घर देत नाही असं थेट सांगितलंं गेलं, असं पंकजा यांनी सांगितलं.

घर घेण्यासाठी परवानगीची गरज काय?

'मी कोणत्याही एका भाषेची किंवा राज्याची बाजू घेत नाही. मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं सर्वांचं स्वागतच आहे. पण आम्ही यांना घर देत नाही, असं कुणी म्हणत असेल तर चुकीचं आहे. माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव येतो हे दुर्दैवी आहे. देशातील कुठल्याही राज्यात, कुठल्याही भाषेच्या लोकांना घर घेण्यासाठी परवानगीची गरज काय, असा माझा प्रश्न आहे. आज गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपतीचा आशीर्वाद घेऊन जाती, धर्म, प्रांत, भाषिक वादाचं आणि नकारात्मकतेचं विसर्जन करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या