मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  १२ इंचाची छाती किती ठोकणार; अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

१२ इंचाची छाती किती ठोकणार; अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

Dec 23, 2023, 08:19 PM IST

  • Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेत केलेल्या टीकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगेंच्या स्मरणशक्तीतच गडबड आहे. या कोल्हे कुईला मी दाद देत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

Chhagan Bhujbal On Manoj Jarange

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेत केलेल्या टीकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगेंच्या स्मरणशक्तीतच गडबड आहे. या कोल्हे कुईला मी दाद देत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

  • Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेत केलेल्या टीकेवर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जरांगेंच्या स्मरणशक्तीतच गडबड आहे. या कोल्हे कुईला मी दाद देत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

मनोज जरांगेंचे बीडमधील भाषणाचा निम्मा भाग भुजबळांवर होता,  त्यानंतर लेकरं व अन्य विषयांवर होता. आता २० जानेवारीपर्यंत ते शांत बसणार आहेत. तोपर्यंत ते हॉस्पीटलमध्ये आराम करतील. १२ इंचाची छाती आहे किती ठोकणार, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. तसंच, मी अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, असा सणसणीत टोलाही जरांगेंना लगावला.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकाने भाडे नाकारले, जादा भाडे घेतल्यास करा व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार, तातडीने होणार कारवाई

Chiplun Cloudburst Rains: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी! अर्ध्या तासात धडकी भरवणारा पाऊस, मे महिन्यातच नद्यांना पूर

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

बीडमध्ये जरांगेंनी इशारा सभा पार पडली. या सभेत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जहरी टीका केली. तू थांब एकदा.. आरक्षण मिळू दे मग तुला कचकाच दाखवतो.. तुझी खूप दिवसांपासून फडफड सुरू आहे.’ अशा शब्दात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. यावर भुजबळ यांनी पलटवार केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, कोणाला दुखावण्याची मला हौस नाही. मला माझी जबाबदारी  समजते. एकाच भाषणात विरोधाभास होणार नाही, याची काळजी जरांगेंनी घ्यावी. त्यांच्या स्मरणशक्ती मध्येच गडबड आहे. एकाच भाषणामुळे ते दुहेरी बोलतात. त्यासाठी त्यांनी प्राणायाम, अनुलोम-विलोमचा अभ्यास करावा. त्यामुळे भाषणात तोच तोच पणा येणार नाही, असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला.

जरांगे आपल्या भाषणात व्याह्यांना द्या, त्यांच्या व्याह्यांना द्या हे काही बोललेच नाहीत. आता ते म्हणतात हॉटेल आमच्याच माणसांनी जाळली. म्हणजे, बीडमध्ये आमदार सोळंके यांचं घर मीच जाळलं, संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग आम्हीच लावली.

नंतर ते म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनीच आग लावली. ते म्हणतात आगी आम्ही लावून मराठा समाजातील तरुणांना अडकवलं. नंतर ते म्हणाले, मराठ्याच्या नांदाला लागू नाही, नाहीतर बीडला काय झालं ते लक्षात ठेवा. म्हणजे, तुमच्या लोकांनी काय केलं ते त्यांनी कबूल केलं आहे.

पुढील बातम्या